Posts

Showing posts from March, 2024

निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

  निवडणूक आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द अमरावती , दि. 31 (जिमाका):   लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता दि.16 मार्चपासून लागु झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल 2024 रोजी 07-अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी , असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक यांनी केले आहे.‍. 00000

जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतदारांना संबोधित करणार; फेसबुक लाईव्ह शो मध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग

Image
  जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतदारांना संबोधित करणार ; फेसबुक लाईव्ह शो मध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग   अमरावती , दि. 31 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानांची टक्केवारी वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ मतदानावर बोलू काही ’ या फेसबुक लाईव्ह शोचे आयोजन सोमवारला सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार , पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ,   जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी , आयुक्त देविदास पवार हे सहभागी होणार असून जिल्ह्यातील सर्व मतदारांना फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.       जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या युक्त्याची अंमलबजावणी करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ.कैलास घोडके यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मतदानावर बोलू काही या या फेसबुक लाईव्ह शोला मिळत असलेला उदंड प्रतिसाद बघून स्वतः जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभाग घेऊन मत जिल्ह्यातील मतदारांसोबत संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रत्येक गावातील नागरिक सहभागी होणार अस

07- अमरावती लोकसभा मतदार संघात आज एका उमेदवाराचे चार नामनिर्देशन पत्र दाखल

Image
  07- अमरावती लोकसभा मतदार संघात आज एका उमेदवाराचे चार नामनिर्देशन पत्र दाखल अमरावती, दि.   30 (जिमाका) :सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज एका उमेदवाराकडून चार नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. उमेदवाराचे नाव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार बळवंत बसवंत वानखडे. श्री. वानखडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात 4 नामांकन अर्ज दाखल केले.           आज दि. 30 मार्च रोजी 07- अमरावती लोकसभा मतदारसंघात   58 लोकांमर्फत 95 नामनिर्देशन पत्र उचल झालेले असून 04 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे.           4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे. 00000

निवडणूक खर्च निरीक्षकांनी खर्च पथक व माध्यम कक्षाला दिली भेट; निवडणूक खर्च संबंधित यंत्रणेचा घेतला आढावा

Image
  निवडणूक खर्च निरीक्षकांनी खर्च पथक व माध्यम कक्षाला दिली भेट; निवडणूक खर्च संबंधित यंत्रणेचा घेतला आढावा अमरावती, दि. 29 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अमरावती मतदार संघांकरिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून अनुप कुमार वर्मा यांची नियुक्ती केली आहे. श्री. वर्मा यांनी खर्च विषयाशी संबंधित यंत्रणेचा आढावा निवडणूक खर्च कक्ष येथे घेतला. तसेच निवडणूक खर्च व माध्यम कक्षाला भेट देऊन निवडणूक संदर्भातील खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना त्यांनी   दिल्या. खर्च   निरीक्षक श्री. वर्मा हे मतदार संघात तिन वेळा भेटी देणार असून प्रथम भेटीसाठी गुरुवार   दि. 28 रोजी जिल्ह्यात दाखल झाले. दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या सोबत निवडणुक संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे निर

स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर; निवडणूकीत मतदार स्वंयसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन

Image
  स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर; निवडणूकीत मतदार स्वंयसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन                 अमरावती, दि. 29 (जिमाका): अमरावती विधानसभा मतदार संघामार्फत तहसिल कार्यालयाच्या सभागृहात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदार जागृती व स्पर्धा परिक्षा मागर्दर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी मतदानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगून निवडणूकीत मतदार स्वंयसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले.              मार्गदर्शन शिबीराला नवयुकांची मोठ्या प्रमाणावर हजेरी होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मीनू पी. एम., मुख्याधिकारी नगरपंचायत तिवसा नरेश अकनुरी, उपमुख्य कार्यापालन अधिकारी डॉ.कैलास घोडके, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर,   तहसिलदार विजय लोखंडे, महानगरपालीकाचे सीडीपीओ नरेद्र वानखडे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धा परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. स्पर्धा परिक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने   विद्यार्थ्यांनीही म

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये सिद्धान्त मोडक प्रथम; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले कौतूक व अभिनंदन

  राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये सिद्धान्त मोडक प्रथम; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले कौतूक व अभिनंदन              अमरावती, दि. 29 (जिमाका): राज्यस्तरीय पात्रता फेरीत अमरावती येथील सिद्धांत मोडकने पेंटिंग अँड डेकोरेटींग या कौशल्य प्रकारात सुवर्ण पदक पटकविले. सिद्धान्तच्या कामगिरीचे दखल घेऊन   जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सिद्धांतच्या मातोश्रीस स्मृतीचिन्ह देऊन त्याचा गौरव केला. तसेच त्यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार ‌उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, विकास समन्वयक वैभव तेटू व वरिष्ठ-लिपिक प्रविण बांबोळे, तसेच   सिद्धान्त मोडकच्या मातोश्री प्रमिला दिलीप मोडक उपस्थित होत्या. भारतीय उद्योग महासंघ(CII) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ(NSDC) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत दि. 19 व 20 मार्च 2024 रोजी डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंग, मुंबई येथे राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   फ्रान्समधील लियोन येथे आयोजित प्रतिष्ठित जागतिक क

"मतदानावर बोलू काही....." मतदारांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लाईव्ह शो - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  लोकसभा निवडणूक-2024 "मतदानावर बोलू काही....." मतदारांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लाईव्ह शो - जिल्हाधिकारी सौरभ कटियार   अमरावती, दि. 28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मतदारांना आकर्षित करण्यासाठी नोडल अधिकारी   डॉ. कैलास घोडके यांनी मतदानावर बोलू काही या फेसबुक लाईव्ह शो चे आयोजन केले असून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडिया हे युवकांमध्ये आवडीचे माध्यम असून आबालवृद्ध सोशल मीडियावर सक्रिय आहे. या माध्यमाचा उपयोग करून घेतल्यास मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच फायदा होईल, ही बाब लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकापर्यंत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी "मतदानावर बोलू काही......" या लाईव्ह फेसबुक शो चे आयोजन हेमंतकुमार यावले यांच्

स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर; निवडणूकीत मतदार स्वंयसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन

  स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदांरासाठी जनजागृती शिबीर; निवडणूकीत मतदार स्वंयसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन                 अमरावती, दि. 29 (जिमाका): अमरावती विधानसभा मतदार संघामार्फत तहसिल कार्यालयाच्या सभागृहात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत नवमतदार जागृती व स्पर्धा परिक्षा मागर्दर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी मतदानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगून निवडणूकीत मतदार स्वंयसेवक म्हणून कार्य करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी केले.   मार्गदर्शन शिबीराला नवयुकांची मोठ्या प्रमाणावर हजेरी होती. यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मीनू पी. एम., मुख्याधिकारी नगरपंचायत तिवसा नरेश अकनुरी, उपमुख्य कार्यापालन अधिकारी डॉ.कैलास घोडके, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर,   तहसिलदार विजय लोखंडे, महानगरपालीकाचे सीडीपीओ नरेद्र वानखडे आदी उपस्थित होते.   उपस्थित मान्यवरांनी मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच स्पर्धा परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले. स्पर्धा परिक्षेच्या तयारीच्या अनुषंगाने   विद्यार्थ्यांनीही मोठ्या

राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये सिद्धान्त मोडक प्रथम; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले कौतूक व अभिनंदन

  राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये सिद्धान्त मोडक प्रथम; जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले कौतूक व अभिनंदन   अमरावती, दि. 29 (जिमाका): राज्यस्तरीय पात्रता फेरीत अमरावती येथील सिद्धांत मोडकने पेंटिंग अँड डेकोरेटींग या कौशल्य प्रकारात सुवर्ण पदक पटकविले. सिद्धान्तच्या कामगिरीचे दखल घेऊन   जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सिद्धांतच्या मातोश्रीस स्मृतीचिन्ह देऊन त्याचा गौरव केला. तसेच त्यास पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार ‌उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, विकास समन्वयक वैभव तेटू व वरिष्ठ-लिपिक प्रविण बांबोळे, तसेच   सिद्धान्त मोडकच्या मातोश्री प्रमिला दिलीप मोडक उपस्थित होत्या.   भारतीय उद्योग महासंघ(CII) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ(NSDC) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत दि. 19 व 20 मार्च 2024 रोजी डॉन बॉस्को सेंटर फॉर लर्निंग, मुंबई येथे राज्यस्तरीय कौशल्य विकास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   फ्रान्समधील लियोन येथे आयोजित प्रतिष्ठित जागतिक कौशल

07- अमरावती लोकसभा मतदारसंघात एक नामनिर्देशनपत्र दाखल; 75 नामनिर्देशन अर्जाची उचल

  07- अमरावती लोकसभा मतदारसंघात एक नामनिर्देशनपत्र दाखल; 75 नामनिर्देशन अर्जाची उचल   अमरावती, दि. 28 (जिमाका):  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज एक नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. श्री. व्यंकटेश्वरा महा स्वामीजी ऊफ दीपक (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच आज 43 व्यक्तींनी 75 नामनिर्देशन अर्ज खरेदी केले.   07- अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी आज गुरुवार  दिनांक 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे. 00000

दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

Image
  लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024; दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार               अमरावती, दि.28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेचा सर्व पीडब्ल्यूडी(पर्सनल व्हीथ डिसॲबेलिटी) मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून मतदारांसाठी दिलेला सोयी सुविधा प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पीडब्ल्यूडी नोडल अधिकारी जया राऊत यांनी केले आहे.   पीडब्ल्यूडी (पर्सनल व्हीथ डिसॲबेलिटी) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेले सक्षम ॲपवर विविध सोयी सुविधा देण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक पीडब्ल्यूडी मतदाराने सक्षम ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावा. निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरीता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग वयोवृद्ध मतदारांना या सक्षम ॲपद्वारे मतदानासाठी लागणाऱ्या सहायतेची

निवडणूकीबाबत सूचना

  निवडणूकीबाबत सूचना                 अमरावती, दि. 27 (जिमाका): 07- अमरावती लोकसभा मतदार संघातून एका सदस्याची लोकसभेसाठी निवडणूक घ्यावयाची आहे. नामनिर्देशनपत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला, निवडणूक निर्णय अधिकारी, 07- अमरावती लोकसभा मतदार संघ किंवा उपविभागीय अधिकारी, अमरावती उपविभाग तथा सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे   दि. 4 एप्रिल 2024 (गुरूवार) पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत महसुल भवन जिल्हाधिकारी यांचे दालनाशेजारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती-444602 येथे दाखल करता येतील.             नामनिर्देशपत्रे वर उल्लेख केलेल्या ठिकाणी व वेळी मिळू शकतील. नामनिर्देशपत्रे छाननी दि. 5 एप्रिल, 2024 (शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता , महसूल भवन जिल्हाधिकारी यांचे दालनाशेजारी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबद्यलची सूचना उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या निवडणूक प्रतिनिधीला वरील परिच्छेदामध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास उपरोक्त नम

लोकसभा निवडणूक-2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य

  लोकसभा निवडणूक-2024   लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदानासाठी ‘इपिक’सह बारा ओळखपत्र ग्राह्य   अमरावती, दि. 26 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरीता मतदान ओळखपत्रासह (EPIC) 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहे.   07-अमरावती लोकसभा मतदार संघात 26 एप्रिलला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी स्वतःची ओळख पटविण्याकरीता निवडणूक आयोगाने बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहे.   त्यामुळे आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करतांना मतदारांची ओळख पटविणे शक्य होणार आहेत. या ओळखपत्रात आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या फोटोसह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र व राज्य सरकार / पीएसयू / पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत

गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी वाढणार

Image
  गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी   वाढणार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी सौरभ कटियार                 अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत . जिल्हा आणि तालुका पातळीवर मतदान जनजागृती करण्यासाठी मतदार जागृती कक्ष स्थापन करण्यात आले असून गावागावात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी   यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी येथे महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, शिक्षिका आणि बचत गटांची महिला यांचा "द पिंक फोर्स" जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.               मागच्या वेळीच

संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’; मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार

Image
  संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’; मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार अमरावती दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. 26 मार्चला अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर "चुनाव की पाठशाला" हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये   जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येईल. मतदार जनजागृती करण्याचा हा एक अभिनव उपक्रम असून यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार केले आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप कक्ष' अर्थात पद्धतशीरपणे मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग या कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावागावात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या अवलंबण्

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Image
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अमरावती दि.24 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने   मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या   कार्यक्रमात आज मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात प्रथम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी मार्गदर्शन केले. मतदान पथकांनी करावयाचे कार्य, मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी प्रात्यक्षिक, सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूकीचे प्रथम प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदार संघात दि. 23 व 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणाकरीता नियुक्त 12 हजार 355 मतदान केंद्रा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Image
    लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण   अमरावती दि.24 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने   मनुष्यबळ प्रशिक्षणाच्या   कार्यक्रमात आज मतदान केंद्राध्यक्ष व इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.   येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात प्रथम प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी मार्गदर्शन केले. मतदान पथकांनी करावयाचे कार्य, मतदान केंद्राध्यक्षाची भूमिका, ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट आदी यंत्रणा आदींबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.   निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी यासाठी प्रात्यक्षिक, सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूकीचे प्रथम प्रशिक्षण जिल्ह्यातील सर्व आठ विधानसभा मतदार संघात दि. 23 व 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणाकरीता नियुक्त 12 हज

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर

  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर   अमरावती दि.24 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. कार्यक्रमानुसार अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 26 एप्रिल 2024 या मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, कंपन्या व संस्थाना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील. तथापि अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास अशा व्यवस्थापनाने कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कमीत कमी दोन तासाची सवलत देता येईल. मात्र त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. 00000

संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’; मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार

Image
  संपूर्ण जिल्ह्यात ‘चुनाव की पाठशाला’; मतदारांमध्ये जनजागृती करणारा एक अभिनव उपक्रम: सौरभ कटीयार   अमरावती दि.24 (जिमाका) : जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दि. 26 मार्चला अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण मतदान केंद्रावर "चुनाव की पाठशाला" हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये   जास्तीत जास्त मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात येईल. मतदार जनजागृती करण्याचा हा एक अभिनव उपक्रम असून यामध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार केले आहेत.   मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि अमरावती जिल्ह्यातील मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप कक्ष' अर्थात पद्धतशीरपणे मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील सहभाग या कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गावागावात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन

Image
  जिल्हाधिकारी कार्यालयात शहीदांना अभिवादन        अमरावती, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान देणारे शहीद भगत सिंग, राजगुरु,सुखदेव यांना आज शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात तहसिलदार निलेश खटके यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 00000

कॉलेज कॅम्पस अँबेसेडर वाढविणार मतदानाचा टक्का !

  कॉलेज कॅम्पस अँबेसेडर वाढविणार मतदानाचा टक्का ! अमरावती, दि. 23 (जिमाका) :   अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही वापरण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके   यांच्या उपस्थितीत विमलाताई देशमुख महाविद्यालयात जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमधील दोन अशा शंभर विद्यार्थ्यांची   कार्यशाळा घेण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांची कॉलेज कॅम्पस अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली असून ते महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसेच मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत.          शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत -जास्त लोकांनी मतदान करावे आणि आपल्या मतदानांचा हक्क बजावावा म्हणून प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. यासाठी मतदारांचे शिक्षण आणि मतदान प्रक्रियेतील सहभाग (स्वीप) या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्

गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी वाढणार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  गावागावात 'पिंक फोर्स' पुढे येणार , मतदानाची टक्केवारी   वाढणार मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे - जिल्हाधिकारी सौरभ कटियार                अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत . जिल्हा आणि तालुका पातळीवर मतदान जनजागृती करण्यासाठी मतदार जागृती कक्ष स्थापन करण्यात आले असून गावागावात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी   यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी येथे महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, शिक्षिका आणि बचत गटांची महिला यांचा "द पिंक फोर्स" जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.               मागच्या वेळी