Sunday, March 31, 2024

जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतदारांना संबोधित करणार; फेसबुक लाईव्ह शो मध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग

 



जिल्हाधिकारी सौरभ कटियार मतदारांना संबोधित करणार
;

फेसबुक लाईव्ह शो मध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग

 

अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानांची टक्केवारी वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मतदानावर बोलू काहीया फेसबुक लाईव्ह शोचे आयोजन सोमवारला सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,  जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, आयुक्त देविदास पवार हे सहभागी होणार असून जिल्ह्यातील सर्व मतदारांना फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.

     

जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या युक्त्याची अंमलबजावणी करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीपचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ.कैलास घोडके यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मतदानावर बोलू काही या या फेसबुक लाईव्ह शोला मिळत असलेला उदंड प्रतिसाद बघून स्वतः जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यामध्ये सहभाग घेऊन मत जिल्ह्यातील मतदारांसोबत संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रत्येक गावातील नागरिक सहभागी होणार असून प्रतिनिधी स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील एका गावातील काही ज्येष्ठ नागरिक, महिला, नवीन मतदार, शेतकरी हे जिल्हाधिकारी यांच्या सोबत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे अमरावती जिल्ह्यातील गावागावात प्रेक्षपण होणार असून सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...