Tuesday, March 5, 2024

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदान केंद्रांची केली पाहणी; केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 











 जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदान केंद्रांची केली पाहणी;

केंद्रांवरील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

 

 अमरावती, दि. 05 (जिमाका):  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त देवीदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपआयुक्त सागर पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, तहसिलदार विजय लोंखडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी सर्वप्रथम शासकीय विद्या निकेतन जुने अद्यापक विद्यालय, नागपुरी गेट येथील मतदान केंद्राची पाहणी केली. त्यानंतर असोसिएशन उर्दु प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय, मनपा उर्दु हायस्कुल जमील कॉलनी, मनपा शाळा क्रमांक 3 गवळीपुरा व वलगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, कनेक्टीव्हिटी, विजेचा पुरवठा, शौचालयाची सुविधा, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रॅम्पची सुविधा यासह इतर बाबींचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

 

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हीलचेअर उपलब्ध ठेवावी. तसेच रॅम्पही सुस्थितीत असावा. मतदानाच्या दिवशी मतदारांचे उन्हापासून सुरक्षितेसाठी मतदान केंद्रावर मंडप व आवश्यक सोईसुविधा उपलब्ध करावे. मतदान केंद्रावर एकाचवेळी गर्दी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करण्याचेही सूचना जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी दिल्या.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...