जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शनी; 7 ते 9 मार्च दरम्यान आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शनी;

7 ते 9 मार्च दरम्यान आयोजन; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 04 (जिमाका):  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोंन्नती अभियान(उमेद) व महिला आर्थिक विकास महामंडळ(माविम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त बचतगटांच्या उत्पादनांचे जिल्हा प्रदर्शनीचे आयोजन दि.7 ते 9 फेब्रुवारी 2024 दरम्यान सायन्स स्कोर मैदान, मुख्य बस स्थानक समोर, अमरावती येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनीचा नागरिक, महिला तसेच सर्व वयोगटाच्या व्यक्तिंनी लाभ घ्यावा व महिला आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीला पाठबळ द्यावे, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक प्रिती देशमुख यांनी केले आहे.

 

            स्वयंसहाय्यता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे सबलीकरण करणे व उपजीविका आधारित उपक्रम राबविणे याकरिता उमेदमाविम यंत्रणाव्दारे काम करत आहेत. याअंतर्गत स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तू विक्री व प्रदर्शनीचे तीन दिवसांचे आयोजन करण्यात येत आहे. याप्रदर्शनीमध्ये महिलांच्या सर्वांगीण विकास, महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यकरिता विवध तज्ञाचे मार्गदर्शन, कार्यशाळा तसेच विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या प्रदर्शनीत करण्यात येणार आहे.

 

जिल्हा प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील उमेद व माविम अंतर्गत 100 पेक्षा अधिक स्वयं सहाय्यता समूहांचा या सहभागी होणार आहे. ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ व आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शन मध्ये शाकाहारी ज्यामध्ये रोडगे, पिठल, भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी इत्यादी स्थानिक व्यंजनाचा समावेश राहिल.तर मासाहारीमध्ये चिकन, मटन, मांडे, ज्वारी, बाजरी भाकरी या विदर्भातील ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तसेच स्वयं सहाय्यता समूहांकडून उत्पादित बांबू पासून विविध आकर्षक वस्तू, मिक्स मिलेटस कळधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, पंचरत्न लाडू, मोह लाडू, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, सोय प्रोडक्ट सोया इडली, ढोकळा, मोरिंगा पावडर, हळद पावडर, सर्व प्रकारचे लोणचे, खारोडी, जवस चटणी, खडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणाच्या धूप बत्ती, मुंग वडी, इत्यादी विक्री करिता प्रदर्शनीमध्ये मिळणार आहे.

   

प्रदर्शनीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन

 

जिल्हा प्रदर्शनीमध्ये रांगोळी स्पर्धा, रेसिपी स्पर्धा(मिलेटस), मर्दानी खेळ( मलखांब, स्वयं सुरक्षा, साहसी खेळ), खेळ पैठणीचा, लोकनृत्य, आदिवासी नृत्य, योग, मेडीटेशन, झुम्बा, संगीत संध्या, चित्रकला स्पर्धा, वयक्तिक व ग्रूप नृत्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन होणार आहे. तसेच महिलांचे आरोग्य व मानसिक ताण या विषयावर विविध तज्‍ज्ञांव्दारे मार्गदर्शन या प्रदर्शनी दरम्यान होणार आहे.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती