महिला दिनानिमित्त महिला रोजगार मेळावा; 235 महिला उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड:उद्योजक व उमेदवारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

 

महिला दिनानिमित्त महिला रोजगार मेळावा;

235 महिला उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड:उद्योजक व उमेदवारांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद

 

 अमरावती, दि. 12 (जिमाका):  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांचे संयुक्त विद्यमानाने सोमवार दि. 11 मार्च रोजी प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट, वलगांव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा संपन्न झाला. मेळाव्यामध्ये 235 महिला उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मेळाव्यात सहभागी उद्योजक व उमेदवारांसोबत संवाद साधून मार्गदर्शन केले.

           

मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, महिला उमेदवारांना मेळाव्यामध्ये रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध दिली असून त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. तसेच कौशल्य विकास कार्यालयामार्फत बेरोजगार उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाच्या माध्यमातून महिला उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे कौशल्य विकास कार्यालय करीत आहेत. याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.

 

महिला मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामध्ये 372 महिला उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या महिला उमेदवारांपैकी 235 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा वरिष्ठ कोषागार अधिकारी  शिल्पा पवार, विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक  किर्ती चिंतामणी,  अतिरीक्त तुरुंग अधिकारी  संघमित्रा शेळके, प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक संजय मालकर,  मनोज निर्मळ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, कौशल्य विकास अधीकारी श्रीमती वैशाली पवार आदी उपस्थित होते. तसेच जाधव ग्रुप ऑफ कंपनीचे प्रतिनिधी  विकास नाईक, रेडीयंट सुपरस्पेशालीस्ट हॉस्पीटलचे प्रतिनिधी उमेश राठोड, टेक्नोक्रफ्ट प्रा.लि.चे प्रतिनिधी किरण काळे, श्रीधर स्पीनर प्रा. लि. चे प्रतिनिधी  प्रमोद गजभिये, एडीको इंडीया प्रा. लि. बेंगलोर चे प्रतिनिधी  राघवेंद्र, पटले एज्युस्कील नागपूरचे प्रतिनीधी तिनकेश तुरकर, युनिमॅक्स इंडिया हेल्थ केअर सेंटर अमरावतीचे प्रतिनीधी  सावन खेमकर, निको ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नागपूरचे प्रतिनीधी  राहूल सवई, पिपल ट्री व्हेंचर प्रा. लि. अमरावतीचे प्रतिनीधी चंद्रकांत वाघ, स्वतंत्र मायक्रोफीन प्रा.लि. अमरावतीचे प्रतिनीधी  सुधाकर ढालके, ईक्विटास बँक यवतमाळचे प्रतिनीधी  गणेश बावने, गुड लक ब्रॉड बँड प्रा. लि. अमरावतीचे प्रतिनीधी  कृष्णा पाचरे, अॅप-टेट एज्युटेक, अमरावतीचे प्रतिनीधी  नितीन टोंगसे, एल.आय.सी.अमरावतीच्या प्रतिनीधी  महिमा दुबे, ईत्यादी खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या.

 

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती