दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू

 

दुय्यम निबंधक कार्यालय शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरू

 

            अमरावती, दि. 20 (जिमाका): दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणीसाठी पक्षकारांची गर्दी होत असते. तसेच महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना सुरू असल्याने त्या संबंधितचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची वर्दळ वाढत आहे. त्यामुळे पक्षकारांची गैरसोय होवू नये म्हणून शासकीय सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरु राहिल, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी दिली.

 

            मार्च महिण्यामध्ये दि. 23 व 24 तसेच 29 व 31 मार्च 2024 रोजी शासकीय सुट्टी आहे. तसेच दि. 31 मार्च रोजी आर्थीक वर्ष संपत असल्याने सन 2024-25 साठी लागू होत असलेले वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते दि. 1 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येवून संपूर्ण महाराष्ट्राकरीता लागू करण्यात येत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात मार्च महिन्यात दस्त नोंदणी मोठया प्रमाणात होत आहे. त्यामुळे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी हे कार्यालय महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधिचे कामकाज करणेसाठी तसेच अमरावती जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये महाराष्ट्र मुदांक शुल्क अभय योजना व दस्त नोंदणीसाठी दि. 23 व 24 मार्च तसेच दि. 29 ते 31 मार्च 2024 या सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी सुरू ठेवण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी त्यांचे दस्त नोंदणीसाठी तसेच अभय योजनेची प्रकरणे दाखल करण्यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू राहिल. पक्षकारांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती