19 मार्चला विभागीय रोजगार मेळावा; अतांत्रिक पदांसाठी ‘टीसीएस’मध्ये भरती

 

19 मार्चला विभागीय रोजगार मेळावा; अतांत्रिक पदांसाठी ‘टीसीएस’मध्ये भरती

 

 

अमरावती, दि. 14 (जिमाका): कौशल्य, विकास रोजगार व उद्योजकता विभाग व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि. 19 मार्च रोजी डॉ. के. जी देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी टाटा कन्सलटन्सी सव्हिसेस या नामाकिंत कंपनीत अतांत्रिक पदांसाठी भरती होत असून या संधीचा इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त द. ल ठाकरे यांनी केले आहे.

 

‘टीसीएस’मधील अतांत्रिक पदांसाठी बीए, बीकॉम, बीसीए, बीएएफ, बीबीआय, बीबीएम, बी. एस्सी. (कृषी शाखेतील पदवी वगळता) आदी शैक्षणिक पात्रता असणा-यांना अर्ज करता येईल. 2022,2023 आणि 2024 या वर्षात पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार सहभाग घेण्यास पात्र आहेत.  सहभाग नोंदविण्यासाठी आँनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://forms.gle/3zvnHwm8TRU9uB1N9   या लिंकचा वापर करावा.

 

पात्र उमेदवारांनी नियोजित वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे. सोबत मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रती असाव्यात. टीसीएसच्या ऑनलाईन अर्जाची प्रत, पासपोर्ट फोटो, ओळखपत्र (आधार कार्ड,पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, मतदान ओळखपत्र यापैकी), 10 वी आणि 12 वी चे गुणपत्रिका व प्रमाणपत्र, पदवीच्या वर्ष व सत्रनिहाय गुणपत्रिका व प्रमाणपत्र, तात्पुरते पदवी प्रमाणपत्र,अभ्यासक्रम संकलन प्रमाणपत्र असावे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

 

रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी 8983419799, 7218331735, 8605654025, 8668256500, 7020758701 व 7972632828 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती