नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 17 मार्चला नवसाक्षरांची परीक्षा; 30 हजार 500 नवसाक्षर देणार परीक्षा

 

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत 17 मार्चला नवसाक्षरांची परीक्षा;

30 हजार 500 नवसाक्षर देणार परीक्षा

 

अमरावती, दि. 15 (जिमाका): राज्यात सन 2022-23 ते 2026-27 पर्यंत नवभारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पायाभुत साक्षरता व संख्याज्ञान चाचणी परिक्षा रविवार दि. 17 मार्च रोजी होणार आहे. नवसाक्षरांनी नोंदणी केलेल्या शाळांच्या केंद्रांवर उपस्थित राहुन परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद योजनेचे शिक्षणाधिकारी सय्यद राजीक गफ्फार यांनी केले आहे.

 

केंद्रपुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम दि. 18 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान असाक्षरांचे गावनिहाय सर्व्हेक्षण व त्यानंतर ऑफलाईन, ऑनलाईन वर्ग सुरु करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील 30 हजार 500 नवसाक्षरांची नोंद करण्यात आली. या नवसाक्षरांची दि. 17 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 5 वाजेपर्यंत प्रत्येक गावातील जिल्हा परिषद, नगर परिषद, खाजगी शाळांमध्ये होणार आहे. यासाठी  जिल्ह्यातील 2 हजार 200 च्या वर परिक्षा केंद्राची निवड करण्यात आली आहे. तरी नवसाक्षरांनी नोंदणी केलेल्या केंद्रांवर  उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती