धार्मिक अल्पसंख्याक बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान; अर्ज करण्याचे आवाहन

 

धार्मिक अल्पसंख्याक बहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान;

अर्ज करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 11 (जिमाका): धार्मिक अल्पसंख्याकबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान वितरणासाठी प्रस्ताव मागविले आहे. इच्छुक शाळा, महाविद्यालय व संस्थांनी मंगळवार दि. 12 मार्चपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले  आहे.

 

                धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी, अनुदानित व विना अनुदानित किंवा कायम विना अनुदानित, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान दिले जाते.  इच्छूक संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित मुदतीत अर्ज सादर करावा.  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावाची छाननी करून त्रुटीची पुर्तता करून अंतिमरित्या प्राप्त शासनास सादर केला जाईल.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती