कॉलेज कॅम्पस अँबेसेडर वाढविणार मतदानाचा टक्का !

 

कॉलेज कॅम्पस अँबेसेडर वाढविणार मतदानाचा टक्का !

अमरावती, दि. 23 (जिमाका) : अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही वापरण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके  यांच्या उपस्थितीत विमलाताई देशमुख महाविद्यालयात जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेजमधील दोन अशा शंभर विद्यार्थ्यांची  कार्यशाळा घेण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांची कॉलेज कॅम्पस अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली असून ते महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांच्या मदतीने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसेच मतदारांमध्ये जनजागृती करणार आहेत.

         शहरी तसेच ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जास्तीत -जास्त लोकांनी मतदान करावे आणि आपल्या मतदानांचा हक्क बजावावा म्हणून प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. यासाठी मतदारांचे शिक्षण आणि मतदान प्रक्रियेतील सहभाग (स्वीप) या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आणि शहरी भागात प्रचार प्रसिद्धीचे काम हाती घेण्यात आले आहे. असून  जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली  अकरा लोकांची टीम तयार केली असून ते मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी गावोगाव रॅली, महाविद्यालयात विविध स्पर्धा, सावली सभा, पिंक फोर्स, बस स्थानकावर जिंगल्स, चुनाव की पाठशाला इत्यादी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसिद्धी करीत आहेत. यासाठी कॉलेजमधील तरुण वर्गाने पुढे यावे. त्यांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी. वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून लोकांना मतदान करण्यासाठी तयार करावे. मतदारांमधील नैराश्य घालवून अमरावती जिल्ह्यात जास्तीत -जास्त मतदान कसे होईल , यासाठी कॉलेजमधील तरुण वर्गांना पुढे आणत कॉलेज कॅम्पस अँबेसिडरची नेमणूक करण्यात आली आहे . कॉलेज कॅम्पस अँबेसिडर गावात जाऊन प्रचार प्रसिद्धीचे काम करणार आहेत.  अचलपूर तहसीलदार संजय गरकल,  ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, नितीन माहुरे, पंकज मेश्राम आदींनी मार्गदर्शन केले.

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती