Friday, March 1, 2024

धारणी तालुक्यातील विविध विकास कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

 









धारणी तालुक्यातील विविध विकास कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

          अमरावती, दि. 1 (जिमाका): धारणी तालुक्यातील विविध विकास कामाची पाहणी करण्याकरीता गुरुवार दि. 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी तालुक्यात सुरु असलेल्या विविध कामाचा आढावा घेऊन अपूर्ण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिले.

दौऱ्यादरम्यान श्री. कटियार यांनी मौजा बिजूधावडी येथे रोजगार हमी योजनेच्या सीसीटी तसेच डीप सीसीटी कामांना भेट दिली. तसेच कामावर उपस्थित असलेल्या सर्व मजुरांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मौजा तितंबा येथे महाराजस्व अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सातबाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर त्याच गावात रोजगार हमी योजनेमार्फत सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची पाहणी करण्यात आली. मौजा धोदरा येथे मत्स्यव्यवसाय विभागामार्फत संचालित मत्स्यपालन केंद्राची पाहणी (धोदरा धरणातील) करण्यात आली. गावांमधील रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या माती धुराबांध कामाला भेट देऊन तेथील मजुरांशी चर्चा केली. त्यानंतर मौजा मानसूधावडी येथील गडगाधरण मध्यम प्रकल्प व 41 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमजीपी योजनेला भेट देऊन कामाचा आढावा घेतला.  जिल्हा परिषद शाळा मानसुधावडी येथे भेट देऊन वर्गखोल्यांची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

धारण तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर श्री. कटियार यांनी अचलपूर तालुक्यातील उपातखेडा येथील जैवविविधता उद्यान व पायविहीर येथील इंटरप्रिटेशन सेंटरला भेट दिली. भेटी दरम्यान येथे  उपस्थित असलेल्या आदिवासी समुदायाच्या समस्या जाणून घेतल्या.

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...