Posts

Showing posts from May, 2019

पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी जलपुनर्भरणाचा यशस्वी प्रयोग घरोघरी जलपुनर्भरण व्हावे - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती, दि. 30 : पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी स्वत:च्या निवासस्थानी केलेला ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चा प्रयोग यशस्वी झाला असून, केवळ 22 फूट खोलीवर मुबलक पाणी लागले आहे. या प्रयोगाचा खर्च अत्यंत कमी असून, जिल्ह्यातही घरोघरी जलपुनर्भरण व्हावे, असा संदेश पालकमंत्र्यांनी यानिमित्ताने दिला आहे. याबाबत बोलताना श्री. पोटे पाटील म्हणाले की, पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे लाभदायी ठरते. मी माझ्या अमरावतीतील निवासस्थानी छतावर पडणा-या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी प्रयोग केला. गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शोषखड्डे करून मी पावसाचे पाणी जमिनीत मुरवत होतो. त्यामुळे केवळ 22 फूट खोल अंतरावर ट्यूबवेलला मुबलक पाणी लागले. आता हाच प्रयोग प्लास्टिक ड्रम, पाईप, खड्डा याद्वारे शास्त्रोक्त पद्धतीनेही केला. त्याला केवळ सोळाशे रूपये खर्च येतो. या प्रयोगामुळे पाण्याचे पुनर्भरण वेगाने आणि खोलवर होते आणि मोठा जलसंचय होतो. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्

पालकमंत्र्यांकडून विविध उद्योगांचा आढावा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना मिळवून द्यावा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
     अमरावती, दि. 30 : वस्त्रोद्योग पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे प्रकल्प सुरु झाले व पुढील काळातही होणार आहेत. त्यामुळे मोठी मनुष्यबळ निर्मिती होणार आहे. कामगार बांधवांच्या कल्याणासाठीही शासनाने अनेकविध योजना लागू केल्या असून, त्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.             औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योग व संबंधित विविध बाबींचा आढावा पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह उद्योग विभाग, कामगार विभाग व विविध उद्योगांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.               श्री. पोटे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून  उद्योगांचा विकास घडवून आणला. अमरावतीतही वस्त्रोद्योग पार्कमधून अनेक नामांकित कंपन्यांचे प्रकल्प सुरु झाले. भविष्यातही अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. मोठी मनुष्यबळनिर्मितीही होणार आहे. त्यादृष्टीने उद्योगांनीही कामगार बांध

अमरावती विभागात ४ कोटी ३६ लाख ५३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

Image
  अमरावती विभागात ४ कोटी ३६ लाख ५३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट                            सर्व विभागांनी समन्वयाने   ‘ मिशनमोड’वर कामे करावी                   * वृक्षलागवड मोहिमेतून वृक्षप्रेमाचे बीजारोपण प्रत्येकाच्या मनात व्हावे                                                      - वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार * प्रत्येक जिल्ह्याने पुढील काळासाठी ट्री प्लॅन तयार करण्याचे निर्देश * मियावाकी संकल्पनेवर आधारित अटल आनंदवन * अमरावतीतून वृक्षलागवड नियोजन बैठकांचा शुभारंभ *  मोहिमेचा कालावधी   दि.  1 जुलै ते 30 सप्टेंबर अमरावती, दि. २९ : शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात अमरावती विभागाचे ४ कोटी ३६ लाख ५३ हजार नऊशे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून, सर्व विभागांनी समन्वय ठेवून मिशनमोडवर कामे करून हे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश राज्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिले. या चळवळीतून वृक्षप्रेमाचे बीजारोपण प्रत्येकाच्या मनात व्हावे व वृक्षसंगोपन ही सवय व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आगा

खरीप हंगाम नियोजन 2019 नियोजन शेतकऱ्यांच्या अनुदानात कपात केल्यास कठोर कारवाई - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
   अमरावती, दि. २५ : शासनाकडून शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या सवलती व अनुदानाचे वितरण बँकांच्या माध्यमातून किती शेतकऱ्यांना झाले, याची तपशीलवार यादी सादर करावी, तसेच अशा अनुदानात कुठलीही कपात केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज सांगितले. कृषी विभागातर्फे खरीप हंगाम २०१९ नियोजन सभा आणि उन्नत शेती - समृद्ध शेतकरी पंधरवड्या चा शुभारंभ आज नियोजन भवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सर्वश्री अनिल बोंडे, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे,जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी बी -बियाणे,खते औषधी यांची उपलब्धता,पर्जन्यमान सरासरी अंदाज, पीक कर्ज, पेरणी क्षेत्र, पीक विमा, डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आदींबाबत आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अनुदानातून कर्ज रक्कम परस्पर वळती क

दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणी पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Image
दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणी पालक सचिवांनी जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश             मुंबई, दि. १२ :- राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या  २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.             राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.             मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत  २१ मे

अहवाल सादरीकरणात श्री हनुमंत कृ. हेडे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक अमरावती राज्यात सर्वोत्तम

Image
अहवाल सादरीकरणात श्री हनुमंत कृ. हेडे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक अमरावती राज्यात सर्वोत्तम एमटीडीसी : इतर राज्यातील पर्यटन विकासाचा अभ्यास   अमरावती, दि. 12   :   देशाच्या इतर राज्यातील पर्यटन विकासाचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादरीकरणात अमरावतीच्या राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ    प्रादेशिक व्यवस्थापक श्री हनुमंत कृ. हेडे राज्यात सर्वोत्तम ठरले आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यु काळे यांनी ही घोषणा केली. इतर राज्यात पर्यटकांना दिल्या जात असलेल्या सेवा -सुविधा,त्यांचे धोरण, पर्यटन स्थळांसह संपुर्ण बाबींची प्रसिध्दी व पर्यटकांना आकर्षित करणा:या विविध योजनांचा यात समावेश होता. तसेच त्या-त्या राज्यातील पर्यटन विकास महामंडळांच्या निवास व्यवस्थेत झालेला बदल,त्यामुळे वाढलेले उत्पन्न व सेवांचा विस्तार आदींची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक अधिका:यांना दिले होते. त्यानुसार श्री हनुमंत कृ. हेडे वरिष्ठ ,प्रादेशिक व्यवस्थापक, अमरावती    यांच्यावर मध्यप्रदेशातील पर्यटन विकासाचा अभ्यासाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हा दौरा पु

जिल्ह्यातील दृष्काळसदृश गावात उपाययोजना लागू

Image
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला दुष्काळग्रस्त गावांचा आढावा ; नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करण्याचे आदेश अमरावती, दि. 10 : राज्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्याच्या सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि. पेक्षा कमी झाला आहे अशा 268 महसूली मंडळामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून त्या ठिकाणी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पाणी टंचाई व चारा टंचाईच्या परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाचे सुक्ष्म लक्ष असून टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने प्रत्येक उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आपापल्या तालुक्यातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन नागरिकांच्या समस्यांची तत्काळ सोडवणूक करावी, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुष्काळग्रस्त गावात पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच अनुषंगीक बाबींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी निति

महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

Image
 महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी  नितीन  व्यवहारे  यांनी  त्यांच्या  प्रतिमेस  पुष्पहार  अर्पण  करुन  अभिवादन  केले.     यावेळी अनेक  अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

टंचाई निवारणासाठी प्रशासन सुसज्ज उपाययोजनांना गती द्यावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश

Image
*19 गावांत टँकरने पाणीपुरवठा *90 हून अधिक विहिरी अधिग्रहित अमरावती ,   दि . 3 : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणीपुरवठा व आवश्यक उपाययोजना तत्काळ अंमलात आणाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित यंत्रणा व तहसील प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात 19 गावांत 21 टँकरने पाणीपुरवठा होत असून, 91 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.    दुष्काळ निवारणासाठी प्राधान्याने कामे पूर्ण करण्याचे निर्देश आहेत.   नागरिकांना   पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही ,   यासाठी प्रशासनाने   नियोजन   केल्यानुसार सगळ्या तरतुदी अंमलात आणाव्या, असे निर्देश श्री.   नवाल यांनी   दिले आहेत . त्यानुसार 113 विंधनविहीरींचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. 67 कूपनलिकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जिल्हाधिका-यांनी नुकतीच     मुख्य कार्यकारी अधिकारी म नि षा खत्री   यांच्यासह   उपविभागीय अधिकारी ,   तहसीलदार ,   गटविकास अधिकारी तसेच इतर यंत्रणां ची बैठक घेऊन टंचाई निवारणाबाबत निर्देश दिले.    त्याचप्रमाणे, चिखलदरा येथेही नवसंजीवनीच्या बैठकीसह त्यांनी टंचाई स्थिती व उपाययोजनां