Posts

Showing posts from February, 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांना अभिवादन

Image
अमरावती,   दि.   19 :    छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात   जिल्हाधिकारी शैलेश नवाल   यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, खनिकर्म अधिकारी शिरीष नाईक, विधी बोहरा नरेंद्र बोहरा यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचा-यांनीही   छत्रपती शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

शासनाकडून करणार संकुलाची देखभाल विभागीय क्रीडा संकुलात सरावापोटी 100 रुपये शुल्क आकारू नये - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे निर्देश

Image
अमरावती, दि. 19 - विभागीय क्रीडा संकुलात सकाळी फिरायला येणा-या, सराव करणा-या प्रत्येक खेळाडूकडून शंभर रूपये वसूल करण्याचा निर्णय रद्द करावा व शासनाकडूनच संकुलाची देखभाल केली जावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. या निर्णय अनेक क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांच्याशी चर्चा करून हे निर्देश दिले. विभागीय क्रीडा संकुलात सरावासाठी येणा-या खेळाडूंसह फिरण्यासाठी येणा-यांकडून विभागीय क्रीडा संकुल समितीकडून 100 रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली. संकुलाच्या रनिंग ट्रॅक आदींच्या देखभालीपोटी असे शुल्क आकारण्याचा निर्णय संकुल समितीने घेतला होता. मात्र, काही संस्था- संघटनांच्या मागणी लक्षात घेऊन असे कुठलेही शुल्क आकारण्यात येऊ नये आणि शासनाकडूनच या संकुलाची देखभाल केली जावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दिले. विभागीय क्रीडा संकुल मोठे मैदान, रनिंग ट्रॅक व मध्यवर्ती ठिकाण म्हणून अनेक क्रीडाप्रेमी व नागरिकांसाठी सोयीचे ठिकाण आहे. त्यामुळे शेकडो नागरिकांकडून या मैदानाचा सराव, जॉगिंग

पालकमंत्री यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

Image
अमरावती, दि. 19 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विवेक कलोती, जयंत डेहणकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श प्रशासक, कुशल योद्धा व महान राजा होते. त्यांचे जीवनकार्य प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 00000

जिल्हा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद विविध योजनांतून मोठी स्वयंरोजगारनिर्मिती - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
·           मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद ·           विविध विभागांचे तीसहून अधिक कक्ष ·           यशस्वितांचा गौरव ·           यशोमुद्राचे प्रकाशन अमरावती, दि.  18 : देशाची ओळख जगातील संपन्न व स्वयंपूर्ण देश म्हणून व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  केंद्र व राज्य शासनाच्या मुद्रा, स्टार्टअप अशा अनेकविध योजनांतून स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे. विकासाचा हा प्रवाह आणखी गतीने पुढे नेण्यासाठी स्वयंरोजगारांच्या सर्व योजनांची भरीव अंमलबजावणी शासनाकडून सर्वदूर करण्यात येत असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले. मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे जिल्हास्तरीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व मुद्रा लाभार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन येथील नेहरू मैदानावर करण्यात आले. त्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री श्री. पोटे पाटील बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी डॉ. शैलेश नवाल, मनपा स्थायी समिती सभापती विवेक कलोती, जयंतराव डेहणकर, राज्यस्तरीय समितीचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिधडे चौधरी, किरण पात

टंचाई निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
             अमरावती, दि. 11 :    जिल्ह्यातील टंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा व अपेक्षित उपाययोजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी दिले आहेत. पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून 1 हजार 108 उपाययोजना प्रस्तावित असून, सुमारे 24 कोटी 49 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तिवसा तालुक्यातील शेंदोळा बु. मोर्शी तालुक्यातील सावरखेड या गावांत तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजनेस, तर लेहगाव व दाढीपेढी येथे पूरक नळ योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेकडून 10 विंधनविहिरी व नऊ कुपनलिकांची कामे होत आहे. ही कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.   टंचाई निवारणाच्या कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापण्याच्या पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या नियंत्रणात अधिक्षक राम लंके, जि. प. पाणीपुरवठा अभियंता राजेंद्र सावळकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता श्री. कोपुलवार, अव्वल कारकून व्ही. आर. उगल

अमरावती- अकोला जिल्ह्यात कर्करुग्णांचे चिंताजनक प्रमाण गुटखा विक्रीविरुद्ध धडक मोहिम राबवा - आमदार डॉ. सुनील देशमुख

Image
अमरावती, दि. 8 : अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यांतून कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल असून, गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच त्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीए यांनी धडक मोहिम राबवावी, असे निर्देश आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी आज येथे दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, अति. पो. अधिक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी एस. डी. केदारे, बी. के. चव्हाण आदी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाले की, अमरावती व अकोला जिल्ह्यातून अचानक कर्करुग्ण वाढल्याबाबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अधिका-यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यात घस्याचा व अन्ननलिकेचा कर्करोग असलेल्या रुग्णांचा समावेश असून, अवैध गुटखा व ओला खर्रा याबाबतची व्यसनाधीनता हेच कारण आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या जाळ्यात असून, एक पिढी या व्यसना

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला मिळणार गती आमला, नागरवाडीसाठी सुमारे 25 कोटी रु. निधीच्या विकास आराखड्यास मंजुरी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
अमरावती ,   दि. 8 : ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यात श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आमला (ता. दर्यापूर)साठी 6.79 कोटी   व  नागरवाडी (ता. चांदूरबाजार) साठी 18 कोटी रुपये रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. यामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकासाला गती मिळणार आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले. ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात मुंबईत वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे ,   अमरावतीचे पालकमंत्री श्री. पोटे पाटील ,   सामाजिक न्याय राज्यमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे ,   वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर ,   आमदार तानाजी मुटकुळे ,   आमदार बच्चू कडू ,   वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला (ता. दर्यापूर ,   जि. अमरावती) या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण 6 कोटी 79 लाखांचा प्रस्ताव सादर करण्या

समृद्धी महामार्गाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा ‘समृद्धी महामार्गा’च्या कामांना गती द्यावी - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
समृद्धी महामार्गाबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा ‘समृद्धी महामार्गा’च्या कामांना गती द्यावी -            पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील अमरावती, दि. 4 :    समृद्धी महामार्ग हा राज्याच्या संपर्कयंत्रणा व विकासासाठी महत्वपूर्ण असून, त्याच्या कामाला गती देऊन हे काम तत्काळ पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात या विषयावर आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, मनपा आयुक्त संजयकुमार निपाणे, उपायुक्त प्रमोद देशमुख यांच्यासह राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंता उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची लांबी सुमारे 73 कि. मी. आहे. रस्त्याची रुंदी 120 मीटर असेल. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील 46 गावांतून हा रस्ता जाईल. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा गावापासून सुरुवात होऊन नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ येथपर्यंत जिल्ह्यातील रस्ता आहे. जिल्ह्यात महामार्गासाठी 91 टक्के जमिनीचे

अपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची - पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर

Image
अपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची -           पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर अमरावती, दि. 4 : अपघातामुळे केवळ व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे वाहन चालविताना व्यक्तीने सजग व सतर्क असणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सांगितले. परिवहन विभागातर्फे 30 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पोलीस अधिक्षक दिलीप झळके, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते, सार्वजनिक बांधकाम अभियंता विभावरी वैद्य आदी उपस्थित होते. श्री. बाविस्कर म्हणाले की, तरुण पिढीने वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पोलीसांना वाहतूक नियमांसाठी सहकार्य केले पाहिजे. वाहतूक नियम मोडल्यास एखाद्या व्यक्तीवर पोलीसाने कारवाई केली तर त्यालाच रोषाला बळी पडावे लागते. तसे घडू नये. अपघातविरहित सेवा देणा-या वाहनचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत देशमुख यांनी आभार मानले. श्वेता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.
Image
छोट्या व्यावसायिकांच्या गरजा व व्यवसायवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन काम करावे मुद्रा   बँक कर्ज वितरणाबाबत 3 दिवसांत तपशील सादर करा -           पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचे बँकांना निर्देश अमरावती, दि. 4 :    मुद्रा   बँक   योजनेत कर्ज वितरणाबाबत केवळ आकडेवारी न सांगता कर्जदाराची नावे, व्यवसाय आदी सविस्तर तपशील याद्यांसह येत्या 3 दिवसांत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले. छोट्या व्यावसायिकांच्या गरजा व व्यवसायवाढीच्या शक्यता लक्षात घेऊन अधिक प्रभावीपणे व लोकाभिमुख काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.    मुद्रा बँक समन्वय समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्यासह राज्यस्तरीय समितीचे सदस्य किरण पातुरकर, निवेदिता चौधरी दिधडे, जिल्हास्तरीय समितीचे सदस्य विनोद कलंत्री, गिरीश शेरेकर, बादल कुलकर्णी, हरिष साऊरकर, विलास राठोड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अनंत भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा अग्रणी   बँक   अधिकारी श्री. देशमुख, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचर

वरूडमध्ये 8 ते 11 फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय कृषी विकास परिषद शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - आमदार डॉ. अनिल बोंडे

Image
अमरावती, दि. 2  :   कृषी विभाग व विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वरूडमध्ये राष्ट्रीय कृषी विकास परिषद दि. 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, त्याद्वारे कृषी प्रदर्शनासह कृषी संस्कृती दर्शन व नवतंत्रज्ञानाविषयी माहिती, मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.           परिषदेचे उद्घाटन दि. 8 रोजी दुपारी 1 वाजता होईल. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार रामदास तडस, अभिनेते मकरंद अनासपुरे व भारत गणेशपुरे उपस्थित राहतील. यादिवशी सायंकाळी 6 वाजता रामपाल महाराज यांचा ग्राम कृषी सप्तखंजिरी प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.   परिषदेत कृषी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते दि. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता महाराजस्व अभियानाचे उद्घाटन होईल. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यावेळी उपस्थित राहतील. शासकीय योजनांच्या लाभार्थींचा सन्मान सोहळाही यावेळी होईल. यादिवशी सकाळी 11 वाजता शैलेष मधने यांचा चारा, मुक्त संचार गोठा या विषयावर मार्गदर्शन व दु. 4 वाजता दंडार लोककला उत्सव होईल. रविव