जिल्हा स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद विविध योजनांतून मोठी स्वयंरोजगारनिर्मिती - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील








·         मेळाव्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
·         विविध विभागांचे तीसहून अधिक कक्ष
·         यशस्वितांचा गौरव
·         यशोमुद्राचे प्रकाशन
अमरावती, दि.  18 : देशाची ओळख जगातील संपन्न व स्वयंपूर्ण देश म्हणून व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  केंद्र व राज्य शासनाच्या मुद्रा, स्टार्टअप अशा अनेकविध योजनांतून स्वयंरोजगाराला चालना मिळाली आहे. विकासाचा हा प्रवाह आणखी गतीने पुढे नेण्यासाठी स्वयंरोजगारांच्या सर्व योजनांची भरीव अंमलबजावणी शासनाकडून सर्वदूर करण्यात येत असल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.
मुद्रा बँक योजना समन्वय समितीतर्फे जिल्हास्तरीय स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व मुद्रा लाभार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन येथील नेहरू मैदानावर करण्यात आले. त्याचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री श्री. पोटे पाटील बोलत होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी डॉ. शैलेश नवाल, मनपा स्थायी समिती सभापती विवेक कलोती, जयंतराव डेहणकर, राज्यस्तरीय समितीचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिधडे चौधरी, किरण पातुरकर, जिल्हा सदस्य शरद बंड, सोपान गुडधे, गिरीश शेरेकर, हरीश साऊरकर, विलास राठोड, बादल कुलकर्णी, आशिष राठोड, सुनील चरडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अनंत भंडारी, डॉ. क्रांती काटोले, जिल्हा रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके आदी उपस्थित होते.
            प्रारंभी दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या सैनिकांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. पालकमंत्री श्री . पोटे पाटील म्हणाले की, कर्जवितरणाबाबत बँकांनी अधिक सक्रिय व्हावे व छोट्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी  जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रभावीपणे व सकारात्मकपणे कार्यवाही देण्याचे दिले आहेत.   जिल्ह्यात 50 हजारहून अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळून, अनेक छोटे छोटे व्यवसाय निर्माण होत आहेत. या लोकांवर अवलंबून असणा-या दोन लाख उपजिविकेचे साधन मिळाले आहे. या छोट्या छोट्या व्यवसायांची एक साखळी बनून त्यातून आणखी काही पूरक व्यवसायांना चालना मिळत आहे. केवळ कर्जवितरणाचा उद्देश न ठेवता त्यातून स्वयंरोजगार विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचे ध्येयही शासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे.
            अलीकडच्या काळात सुरु झालेल्या अद्ययावत सेवा व तंत्रज्ञानाने बाजारपेठेत नव्या व्यवसायांच्या गरजा निर्माण केल्या आहेत. त्या शोधून तशा स्वयंरोजगाराला चालना देणे आणि नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.  पालकमंत्र्यांनी यावेळी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली व उपस्थित लघुव्यावसायिकांशी संवाद साधला. प्रत्येक लघुव्यावसायिकाच्या उत्पादन व सेवेबद्दल जाणून घेत त्यांनी वाखाणणीही त्यांनी केली. नवे तंत्रज्ञान व मार्केटिंगबाबत त्यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शनही केले.
श्री. अडसूळ म्हणाले की, उद्योगांच्या निर्मितीसह पूरक व छोट्या अनेक व्यवसायांना चालना देऊन अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. वंचित घटकाला प्राधान्य देऊन मुद्रासारख्या योजनेतून विनातारण कर्जाची सोय करण्यात आली आहे. त्याचा लाभ लक्षावधी कुटुंबांना झाला आहे.   
श्री. सूर्यवंशी म्हणाले की, निराशा कधी मनात येऊ देऊ नका. सकारात्मक राहिल्याने सगळ्या संकटांवर मात करता येते. अनेक अडचणींवर मात करून पुढे आलेल्या नागरिकांनी मुद्राच्या सहकार्याने यशस्वी व्यवसाय उभारले. त्यांच्या यशोगाथा प्रेरणादायी आहेत, असे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले. मुद्रा बँक योजनेत देशात 5  लाख 71 हजार कोटी रूपयांचे कर्जवाटप झाले आहे. ही अत्यंत महत्वपूर्ण योजना असून, नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मकपणे अंमलबजावणीला गती मिळाली पाहिजे, असे श्री. पातुरकर म्हणाले.
                                                यशोमुद्राचे प्रकाशन
मुद्रा योजनेचा लाभ घेऊन यशस्वी झालेल्या राज्यातील, तसेच जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या यशोगाथांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. एक हात गमावल्यानंतरही जिद्दीने मूर्तिकला साकारून यशस्वी व्यवसाय करणा-या अचलपूरच्या उमेश बडोदेंसह स्वप्नील भागवत, प्रफुल भुयार, गजानन मते, सोनु कचवाह, मोहन वसंतराव वानखडे, अजय गिरासे, आशिष गटारी, मनोज वाठ, मुकेश मंडपे, कविता नानीर, अनिकेत विनोद नवघरे, धिरज पानेकर, राजा संगेले, भिमराव गुलाबराव डोळस, भारत प्रमोद डहाके, अमोल वानखडे, विद्या रविंद्र सोमाशे, दिपक मलवार, आशिष रामदास गभणे, मनोहर महादेव भुजाडे, सचिन पुंडलीकराव ढोक, अभिजीत किशोरराव मालखेडे, निखिल फंदे, अकबर शेख, आसियाबानो मो. इरफान, परवेज अहमद गुलाम नबी, रेखाताई बोडखे, रक्षाताई ठाकूर,अनिरुद्ध ढवळे, उमेश राणे, बंडू पारणुजी खडसे, गजानन ठाकरे, निलेश दत्तुराव गुल्हाने, प्रदीप रंगराव सोनोने, कृष्णा भिमराव पिढेकर, सुरेश महादेव राऊत आदींचा गौरव यावेळी करण्यात आला.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय, औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था, स्वयंसिद्धा उद्योजकता विकास अभियान, विविध बचत गट यांनी सहभाग घेतला. जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. अग्रणी बँकेचे श्री. देशमुख यांनी स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी प्रास्ताविक केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री. येते यांनी आभार मानले.
                                     मेळाव्याला मोठा प्रतिसाद
नेहरू मैदानावरील विस्तीर्ण मंडपात झालेल्या या मेळाव्यात विविध विभागांचे 30 हून अधिक कक्ष सहभागी होते. आयटीआय, अभियांत्रिकी व इतर विविध शाखांचे विद्यार्थी, तसेच अनेक होतकरू तरूण, नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात स्वयंरोजगार मार्गदर्शन व कलापथक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. सायंकाळपर्यंत सुमारे 10 हजार नागरिकांनी मेळाव्याला हजेरी लावून विविध व्यवसायांविषयी जाणून घेतले. महिला बचत गटांच्या कक्षांमधून विविध पदार्थ, उपयुक्त वस्तूंची मोठी विक्री झाली.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती