Posts

Showing posts from August, 2016
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचे प्रशिक्षण 23 ऑगस्ट पासुन        अमरावती, दि.20 (जिमाका): वरिष्ठ कोषागार कार्यालयातर्फे जिल्हा स्तरावर आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरीता सहसंचालक कार्यालय, लेखा-कोष भवन, विद्यापीठ रोड, अमरावती येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे.           यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व त्यांचे फायदे, सेवानिवृत्ती नंतरचे लाभ, आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी करायची विस्तृत कार्यपद्धती, प्राण कीटचा वापर, कर्मचाऱ्यांच्या माहिती दुरुस्ती करण्यासाठी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात आहरण व संवितरण अधिकारी, वेतन देयक लिपीक व एनपीएस बाबत माहितीगार कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. आहरण अधिकाऱ्यांनी सीएसआरएफ फार्मची माहिती सोबत आणावी. हे प्रशिक्षण महत्वाचे असून यासाठी संबंधितांनी उपस्थित रहावे. 23 ते 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत प्रशिक्षण होईल, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी व्यं. व. जोशी यांनी कळविले आहे.                                                                          00000
सामाजिक सलोख्यासाठी गणेशोत्सव अभियान राबवावे- पालकमंत्री        अमरावती, दि.20 (जिमाका): लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतुन यावर्षी लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्यात येणार आहे. सामाजिक सलोख्यासाठी प्रशासनाने गणेशोत्सव अभियान राबवावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.           व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे वित्त मंत्र्यांनी याबाबत चर्चा केली. त्यानुसार काल (19 ऑगस्ट) रोजी संगीतसुर्य केशवराव भोसले सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकानदार, पोलीस उपायुक्त मोरेश्वर आत्राम उपस्थित होते.           यावेळी लोकमान्य महोत्सव समिती सदस्य संजय फांजे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन केले. प्रत्येक तालुक्यातुन सार्वजनिक गणेश मंडळांनी या अभियानात सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.           टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवात राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्याच्या दृष्टीने उपक्रम राबवावे, पर्यावरण पुरक गणेशोत्सव असावा अशा सुचनाही पालकमंत्री यांनी दिल्या.      
Image
जलयुक्त शिवार अभियानातील अपुर्ण कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर पर्यत मुदतवाढ *विभागात 143327 टीसीएम जलसाठा निर्माण जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे        अमरावती, दि.19 (जिमाका): जलयुक्त शिवार हा महाराष्ट्‌र शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम असुन या अभियानांतर्गत सन 15-16 या वर्षापासुन पुढील पांच वर्षे दर वर्षी 5 हजार याप्रमाणे 25 हजार गावें टंचाईमुक्त करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात सन 15-16 मध्ये 6202 गावांची तर 16-17 मध्ये 5281 गावांची निवड करण्यात आली आहे. अमरावती विभागात 1369 गावें 15-16 मध्ये निवडण्यात आली आहे. या गावातील अपुर्ण असलेली कामे तातडीने पुर्ण करता यावी म्हणुन डिसेंबर 2016 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सन 2016-17 या वर्षातील निवडण्यात आलेल्या गावातील कामे मार्च 2017 पर्यत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिलेत. येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागातील जलसंधारण विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कृ
राज्यमंत्री महसुल संजय राठोड यांचा दौरा        अमरावती, दि.19 (जिमाका): राज्यमंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ संजय राठोड यांचा दि. 20 ऑगस्ट रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. राज्यमंत्री महसुल संजय राठोड हे दि.20 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे येतील व वेळ राखीव.  सकाळी 10.05 वा. मनोर मांगल्य मंगल कार्यालय येथे आयोजित विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील. सकाळी 11 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. शासकीय वाहनाने नेर कडे प्रयाण करतील.                                                                         00000
Image
अत्याधुनिक सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण * अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणार- पालकमंत्री        अमरावती, दि.19 (जिमाका): जिल्हा सामान्य रुग्णालयातील बहुप्रतिक्षीत सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण आज पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सामान्य रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना या सीटी स्कॅन मशीनच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधीत या मशीनच्या उपलब्धतेसाठी जिल्हा नियोजन समितीतुन 2 कोटी 42 लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी उपलब्ध करुन दिला. यावेळी व्यासपीठावर महापौर चरणजीत कौर नंदा, आमदार सर्वश्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. सुनील देशमुख, ॲड. श्रीमती यशोमती ठाकुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, सुपर स्पेशालीटीचे अधीक्षक डॉ. श्यामसुंदर सोनी व आरोग्य यंत्रणेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अरुण राऊत यांनी केले. त्यांनी 2011 पासून मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविण्यास अडचणे येत होती मात्र आता आज लोकार्पण झालेली ही मशीन उद्यापासुन कार्यरत होणार असून रुग्णांसाठ
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 19 ऑगस्ट रोजी  अमरावती जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.18 : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.19 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.           दि. 19 ऑगस्ट, 16 रोजी  सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, परतवाडा येथे आगमन, प्रा. तोंडगावकर यांचे घरी सदिच्छा भेट आणि नंतर विविध स्थानिक शाळांना सदिच्छा भेट. दुपारी 1.15 वा. करजगांव ता. चांदूरबाजार येथे आगमन व भाऊसाहेब पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. शिरजगांव कसबा येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. दुपारी 2.30 वा. ब्राम्हणवाडा येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. दुपारी 3.30 वा. घाटलाडकी येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती.           सायं. 5.30 वा. चांदूरबाजार येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 6.30 वा. माधान येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 7.30 वा. देऊरवाडा येथील विविध
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 19 ऑगस्ट रोजी  अमरावती जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.18 : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.19 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.           दि. 19 ऑगस्ट, 16 रोजी  सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, परतवाडा येथे आगमन, प्रा. तोंडगावकर यांचे घरी सदिच्छा भेट आणि नंतर विविध स्थानिक शाळांना सदिच्छा भेट. दुपारी 1.15 वा. करजगांव ता. चांदूरबाजार येथे आगमन व भाऊसाहेब पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. शिरजगांव कसबा येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. दुपारी 2.30 वा. ब्राम्हणवाडा येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. दुपारी 3.30 वा. घाटलाडकी येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती.           सायं. 5.30 वा. चांदूरबाजार येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 6.30 वा. माधान येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 7.30 वा. देऊरवाडा येथील विविध
अमरावती जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन चा आज लोकार्पण सोहळा          अमरावती, दि.18 (जिमाका) : जिल्हा जिल्हा नियोजन समिती अमरावती यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या 2 कोटी 42 लक्ष रुपये निधीच्या माध्यमातून नव्याने स्थापित करण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचा शुभारंभ पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते आज दुपारी 2 वाजता ज्ल्हिा रुग्णालय येथे होणार आहे. या समाराभाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनिल देशमुख राहणार असून खासदार, आमदार, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य, जिल्हा परिषद व महानगरपालिका यांचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांना निमंत्रीत केले आहे. आरोग्य विभागाच्या सचिव श्रीमती सुजाता सौनिक मॅडम, आरोग्य संचालक डॉ.जाधव , अतिरिक्त संचालक पाटील मॅडम, तसेच पोलिस महासंचालक दत्तात्रय मंडलिक, विशेष पोलिस महानिरिक्षक विठ्ठल जाधव आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहाणार आहेत.           तरी सर्वांनी या समारंभास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी केले आहे.                                                 00000 
या वर्षाचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करणार मंडळांच्या स्पर्धांची माहिती देण्यासाठी 19 ऑगस्ट रोजी 5 वा. सभेचे आयोजन           अमरावती, दि.17 (जिमाका) : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्या वतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान हा लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी त्यांनी हे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.             गित्ते म्हणाले की, लोकमान्य महोत्सवाच्या निमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे असे अपेक्षित असुन स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यासाठी व मंडळांना सहभागी करुन घेण्यासाठी शासनाच्या वतीने आवाहन करण्याकरीता लोकमान्य महोत्सव समितीचे सदस्य संजय फांजे हे अमरावती येथे येत असुन दि.19 ऑगस्ट, 16 रोजी सायं.5 वाजता संगितसुर्य केशवराव भो
जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे 19 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.17 (जिमाका) : जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे हे दि.19 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.   दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. नागपुर वरुन शासकीय मोटारीने अमरावती कडे निघतील. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन. सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आगमन व विभागातील सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत आयोजित केलेल्या जलयुक्त शिवार व जलसंधारण विभागाच्या योजनांच्या एक दिवसीय आढावा बैठकीत उपस्थिती. सायं. 5 वा. विभागीय आयुक्त कार्यालय येथे पत्रकार परिषद. सायं. 6 वा. शासकीय मोटारीने गणेश विहार नं. 2 जगदाळे लेआऊट कडे प्रयाण. सायं. 6.15 वा. गणेश विहार नं. 2 जगदाळे लेआऊट येथे तुषार भारतीय यांच्या निवास स्थानी राखीव. रात्री. 7.30 वा. शासकीय मोटारीने बडनेरा रेल्वे स्टेशन कडे प्रयाण. सायं. 7.50 वा. विदर्भ एक्सप्रेस ने नाशिक कडे प्रयाण. 00000
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे येथे अमरावती प्रदेशातील 8 वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव वनसंरक्षण, वन व वन्यजीव व्यवस्थापन व वनविस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य        अमरावती,दि.16(जिमाका): वनसंरक्षण,वन्यजिव व्यवस्थापन व वनविस्तार क्षेत्रात सन 2013-14, 2014-15 या वर्षात उत्कृष्ट  कामगिरी करणाऱ्या अमरावती प्रदेशातील 8 वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुवर्ण व रजत पदके देऊन मा.राज्यपाल  सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यशदा पुणे येथे नुकतेच गौरविण्यात आले अशी माहिती मुख्य वन संरक्षक संजीव गौड यांनी दिली.           या समारंभास वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) सर्जन भगत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.           गौड म्हणाले की, मा.राज्यपाल महोदयांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या गौरव समारंभात राज्यातील एकुण 48 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मा.राज्यपाल यांच्या हस्ते असा कार्यक्रम राज्यात प्रथमच पार पडला आहे. वन मंत्
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे येथे अमरावती प्रदेशातील 8 वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव वनसंरक्षण, वन व वन्यजीव व्यवस्थापन व वनविस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य        अमरावती,दि.16(जिमाका): वनसंरक्षण,वन्यजिव व्यवस्थापन व वनविस्तार क्षेत्रात सन 2013-14, 2014-15 या वर्षात उत्कृष्ट  कामगिरी करणाऱ्या अमरावती प्रदेशातील 8 वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुवर्ण व रजत पदके देऊन मा.राज्यपाल  सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यशदा पुणे येथे नुकतेच गौरविण्यात आले अशी माहिती मुख्य वन संरक्षक संजीव गौड यांनी दिली.           या समारंभास वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) सर्जन भगत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.           गौड म्हणाले की, मा.राज्यपाल महोदयांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या गौरव समारंभात राज्यातील एकुण 48 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मा.राज्यपाल यांच्या हस्ते असा कार्यक्रम राज्यात प्रथमच पार पडला आहे. वन मंत्
‘सृजन’ या ई-मासिकासाठी साहित्य पाठवावे           अमरावती, दि.16 (जिमाका) : सहसंचालक, लेखा व कोषागरे कार्यालयामार्फत ‘सृजन’ ई-मासिक सुरु करण्यात आले असुन यासाठी सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्यातील साहित्यीक गुणांना अभिव्यक्त करण्यासाठी दर महिन्याच्या 5 तारखेपर्यत लेख तथा कविता पाठवाव्यात. सुशासनाबद्दल अपेक्षा व अभिनव प्रशासकीय प्रयोग याबद्दल सर्व माहिती पीडीएफ फॉर्मेट मध्ये पाठवावी. साहित्य पाठविण्याचा पत्ता- jd.amravati@mahakosh.in , adtrainingdat.amr_mh@gov.in वर पाठविण्यात यावी. काही अडचण असल्यास 0721-2553871 संपर्क साधाण्यात यावा. असे सहसंचालक, लेखा व कोषागरे कार्यालय यांनी कळविले आहे.           00000
राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील  अमरावती जिल्हा दौऱ्यावर           अमरावती, दि.16 (जिमाका) : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि. 16 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौऱ्यावर असुन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.           दि.16 ऑगस्ट, 16 रोजी सकाळी 11 वाजता साबू मंगल कार्यालय मोर्शी येथे पदवीधारकांच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. मोर्शी येथुन मोटारीने बेनोडा कडे प्रयाण. दुपारी 1 वा. बेनोडा येथे आगमन व अशोकराव फरकाडे यांची सदिच्छा भेट. दुपारी 3 वा. शहीद स्मृती विद्यालय बेनोडा येथे शहीदांना मानवंदना कार्यक्रम. सायं. 4.30 वा. बेनोडा वरुन मोटारीने वरुड कडे प्रयाण. सायं. 5 वा. वरुड येथे आगमन व पदवीधारकांच्या बैठकीस उपस्थिती. सोईनुसार वरुड येथून मोटारीने अमरावती कडे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. दि. 17 ऑगस्ट रोजी अमरावती येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. दि. 18 ऑगस्ट रोजी अमरावती येथील स्थानिक कार्यक्रमा
जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा तारखांमध्ये बदल           अमरावती दि. 16 (जिमाका) : जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 25 जुलै, 16 पासुन सुरु झालेले आहे. यापैकी तांत्रिक कारणास्तव बदल झालेल्या क्रीडा स्पर्धा पुढील प्रमाणे.             बास्केट बॉल 14, 17, 19 वर्ष मुले-मुली स्पर्धेचा दिनांक 29 ते 30 ऑगस्ट 2016, 30 ते 31 ऑगस्ट, 16 व 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 16 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे होतील. जलतरण स्पर्धा 14, 17, 19 वर्षे मुले-मुली 1 ते 2 सप्टेंबर, 16 रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे होतील. रायफल शुटींग 14, 17, 19 वर्षे मुले-मुली 3 ते 4 सप्टेंबर रोजी वीर शुटींग स्पोटर्स अकादमी, पारश्री हॉस्पीटल, खापर्डे बगीचा अमरावती येथे होतील. वरील बदल लक्षात घेता शाळांनी सुधारीत तारखेत वयोगट निहाय सकाळी 9 वा. संघ उपस्थित ठेवावे, असे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी कळविले आहे. 00000
राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 80 प्रलंबित व 111 दाखलपुर्व प्रकरणाचा निपटारा 1 कोटी 40 लक्ष 196 रुपयांचा न्याय निवाडा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन           अमरावती दि. 16 (जिमाका) : येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दाखल प्रकरणांपैकी 80 प्रलंबित व 111 दाखलपुर्व प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून एकुण 1 कोटी 40 लाख 64 हजार 196 रुपयांचा न्यायनिवाडा करण्यात आला.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन संपन्न झाले.   अदालतीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश डी.डब्ल्यु. मोडक, श्रीमती व्ही.डी.इंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस.ओझा, सह दिवाणी न्या. वरिष्ठ स्तर एस.बी.भाजीपाले, सह दिवाणी न्या.कनिष्ठस्तर एस. डी.कुऱ्हेकर,पी.ए.पत्की, श्रीमती जी.व्ही.जांगडे-देशपांडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. या लोक अदालतमध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेचे प्रलंबित व दाखल पुर्व प्रकरणे, चेक न वटल्याचे प्रकरणे (निगोशिएबल
Image
पालकमंत्री पोटे यांच्याहस्ते नरदोडा येथील शेततळे व गावतळ्यात जलपूजन           अमरावती दि. 15 (जिमाका) : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे संजय नामदेवराव पोटे यांच्या शेतातील शेततळ्याचे तसेच गाव तलावात जलपूजन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले. या गावातील प्राथमिक शाळेतील व्यायाम शाळेचे उद्घाटन ही त्यांनी केले. त्यानंतर हनुमान मंदिरात आयोजित ग्राम सभेत मार्गदर्शन केले.             या बैठकीस आ.रमेश बुंदिले, रोहयो उपजिल्हाधिकारी काळे, उपविभागीय अधिकारी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.           ना.पोटे म्हणाले, शासन शेवटच्या घटकापर्यंत योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. दरवर्षी आपण टंचाईला सामोरे जातो. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आपल्या गावात पडणारे पाणी आपल्याच गावात जिरविण्यासाठी शोष खड्डे ही योजना अतिशय उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत सर्वांनी शोषखड्डे घ्यावेत. तसचे शौचालय बांधकामाची योजना, रोपवाटिका, वृक्षलागवड, फळबाग लागवड या योजनाही घेण्याची गरज आहे. गावाचे हित पाहणाऱ्या किमान 10-12 लोक
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न           अमरावती दि. 15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याचा 69 वा वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते, रमेश काळे, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे, तहसलिदार शरयु आडे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार व सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 00000 वाघ/गावंडे/सागर/15-08-2016/12-59 वाजता
Image
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब प्रकल्प उपयुक्त पालकमंत्री प्रविण पोटे           अमरावती, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर लॅब प्रकल्प उपयुक्त असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले. येथील पोलिस अधिक्षक ग्रामीण कार्यालयात अत्याधुनिक अशा प्रकारची सायबर लॅब सुरु करण्यात आली असुन त्याचे उद्घाटन व मोबाईल फॉरेन्सीक वाहन लोकार्पण सोहळा ना.पोटे यांच्याहस्ते झाला यावेळी ते बोलत होते.           आ.डॉ.सुनिल देशमुख, विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, फॉरेन्सीक लॅबचे उपसंचालक डॉ.विजय ठाकरे, पोलिस उप अधिक्षक महानवर, कदम आदी उपस्थित होते.           पोटे म्हणाले की, मा.मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून गृह विभाग, विशेष पोलिस महानिरीक्षक व महिला अत्याचार प्रतिबंध सेल यांच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सायबर लॅबची स्थापना करण्यात आली आहे. सायबर क्राईम गुन्ह्याचे वाढते प्रमाण लक्षात घेवून
Image
भारतीय स्वातंत्र्याचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण शेतकरी केंद्रबिंदु मानुन शासनाची भरीव कामगिरी             अमरावती, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याचा 69 वा वर्धापन दिनानिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलिस अधिक्षक ग्रामीण लखमी गौतम उपस्थित होते.           यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विकासपर कामांवर प्रकाश टाकला. त्यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांसाठी संजिवनी ठरले असुन जिल्ह्यातील 253 गावांमध्ये 33703 टिएमसी जलसाठा निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 253 पैकी 127 गावांना 100 टक्के जलयुक्त घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्याला केंद्र बिंदू मानून अनेक योजना यशस्वीरित्या राबवित आहे. त्यामध्ये पांदन रस्ते विका