Tuesday, August 2, 2016

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज न मिळाल्यास
राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्ज घेण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन
जिल्हाधिकारी गित्ते

          अमरावती, दि. 2 : अमरावती जिल्ह्यात 415000 शेतकरी असुन त्यापैकी 394580 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सेवा सहकारी संस्था यांचे सभासद आहेत. त्यापैकी दि.31 मार्च, 16 अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 61499 थकबाकीदार शेतकरी आहेत. दि.31 जुलै, 16 पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ 40337 शेतकऱ्यांना रु.336.23 कोटीचे पीक कर्ज वाटप केलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज न मिळाल्यास राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्ज घेण्याबाबत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
          अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दि.25 जुलै,16 अखेर 20201 शेतकऱ्यांच्या रु.119.77 कोटी पीक कर्जाचे रुपांतर केलेले आहे. तसेच या रुपांतरीत पीक कर्ज झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जावाटपाची सुरुवात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेली आहे. पीक कर्ज घेतलेले शेतकरी, थकबाकीदार शेतकरी, पीक कर्ज रुपांतर झालेले शेतकरी असे एकूण सुमारे 1,22,037 शेतकरी सभासद जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक कर्ज योजनेंतर्गत समाविष्ट केलेले आहेत. परंतु अद्यापही मोठ्याप्रमाणात सभासद शेतकरी पीक कर्जासाठी समाविष्ट होवू शकलेले नाहीत.
          जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सेवा सहकारी संस्थांचे सभासद शेतकरी ज्यांना अद्याप कर्ज मंजुर झालेले नाही अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी पीक कर्जासाठी त्यांच्या परिसरातील नजिकच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. ही विशेष मोहिम दि.15 ऑगस्ट, 16 पर्यंत चालविण्यात येईल असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...