राष्ट्रीय लोक अदालत मध्ये
80 प्रलंबित व 111 दाखलपुर्व प्रकरणाचा निपटारा
1 कोटी 40 लक्ष 196 रुपयांचा न्याय निवाडा
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

          अमरावती दि. 16 (जिमाका): येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालती मध्ये दाखल प्रकरणांपैकी 80 प्रलंबित व 111 दाखलपुर्व प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून एकुण 1 कोटी 40 लाख 64 हजार 196 रुपयांचा न्यायनिवाडा करण्यात आला.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन संपन्न झाले.

 अदालतीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा न्यायाधीश डी.डब्ल्यु. मोडक, श्रीमती व्ही.डी.इंगळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस.ओझा, सह दिवाणी न्या. वरिष्ठ स्तर एस.बी.भाजीपाले, सह दिवाणी न्या.कनिष्ठस्तर एस. डी.कुऱ्हेकर,पी.ए.पत्की, श्रीमती जी.व्ही.जांगडे-देशपांडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

या लोक अदालतमध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेचे प्रलंबित व दाखल पुर्व प्रकरणे, चेक न वटल्याचे प्रकरणे (निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्ट), बँक व इतर वित्तीय संस्थांची दाखलपुर्व प्रकरणे तसेच दिवाणी व फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे आदि एकुण 621 प्रलंबित प्रकरणे व 6371 दाखलपुर्व प्रकरणे लोक अदालती समक्ष ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी 80 प्रलंबित प्रकरणे, 111 दाखलपवूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ज्यामध्ये 1,40,64,196/- रुपयांचा न्यायनिवाडा करण्यात आला. अदालतीमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची पुर्तता करण्यासाठी न्यायाधिश, तज्ज्ञ वकील, सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असलेल्या 5 पॅनलची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती प्रबंधक रविंद्र कांबे यांनी दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती