मनोज नरेंद्र सांगले यांच्याकडून
मांडूळ प्रजातीचा साप जप्त
       अमरावती, दि.02 : दि.31 जुलै, 16 रोजी मनोज नरेंद्र सांगले, रा.अंबाविहार, अकोली रोड, अमरावती यांचे राहते घरी मांडूळ प्रजातीचा साप असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरुन अमरावती वन विभागाचे (संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन) सहाय्यक वनसंरक्षक एस.डी.सोणवने व शिकार प्रतिबंधक दल चे कर्मचारी यांनी सदर घरी धाड टाकली. धाड सत्रादरम्यान त्यांचे घराचे अंगनामध्ये जिन्याखाली माठातील मातीमध्ये एक मांडूळ (दुतोंड्या प्रजातीचा) साप ठेवलेला आढळून आला. सदर वन्यप्राण्याबाबत वाहतुक व मालकी प्रमाणपत्र इत्यादी बाबत कोणतेही वैध कागदपत्रे त्यांचेजवळ आढळून आले नाहीत. त्यामुळे सदर साप जप्त करुन वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39 (a) (d) 44 (a) IV 49, 50 (c) कलम मधील तरतुदीचा भंग केल्याबाबत आरोपी नामे मनोज नरेंद सांगले (वय 32) रा.अंबाविहार, अकोली रोड अमरावती यांच्या विरुद्ध प्राथमिक वनगुन्हा रिपोर्ट क्रमांक 1/14 दि.31 जुलै, 16 जारी करण्यात आला असुन आरोपीस दि.31 जुलै, 16 रोजी या वनगुन्हा प्रकरणी अटक करण्यात आली असुन पुढील चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे. सदर वन्यप्राण्याची वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसुचि IV मधील अनुक्रमित 12 (iii) वर नोंद करण्यात आली आहे.
          ही कार्यवाही येथील अमरावती वनविभागाचे उपवनसंरक्षक हेमंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक एस.डी.सोणवने व शिकार प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र एस.के.वाजगे आणि वनपाल पी.टी.वानखडे, वनरक्षक गावनेर, इंदोरे व वनमजुर चंदु ढवळे, मनोज ठाकुर यांनी पार पाडली.
          आरोपीस दि.1 ऑगस्ट, 16 रोजी मा.मुख्य न्या दंडाधिकारी, अमरावती यांचे न्यायालयात हजर करुन न्यायालयाने सदर आरोपीस दि. 7 ऑगस्ट, 16 पर्यंत 7 दिवसाची फॉरेस्ट कोठडी मंजुर केली आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक एस.डी.सोणवने व शिकार प्रतिबंधक पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के.वाजगे हे करत आहे, असे उपवनसंरक्षक हेमंत मिना यांनी कळविले आहे.
00000



वृत्त क्र.806                                                         दिनांक 02-08-2016
सहकारी संस्था-चौकशी अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करण्यासाठी
अर्ज आमंत्रित
       अमरावती, दि.2 : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती विभाग अमरावती यांच्याकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका (पॅनल) तयार करण्यासाठी सहकार खात्यातुन निवृत्त झालेले अधिकारी (वयाची 65 वर्ष पुर्ण न झालेल्या) निवृत्त न्यायाधिश, वकिल, चार्टर्ड अकाऊंटंट यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी दिली आहे.
          अर्जाचे विहित नमुने दि.5 ते 20 ऑगस्ट, 16 या कालावधीत खालील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत मिळू शकतील, याबाबतची जाहिर सुचना विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
1)    विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, सहकार संकुल, कांता नगर, खामगाव बँक जवळ, अमरावती. दु.क्र. 0721-2663246
2)   जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहकार संकुल, कांता नगर, खामगाव बँक जवळ, अमरावती दु.क्र. 0721-2661633
3)   जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला, हकार संकुल आदर्श कॉलनी, अकोला. दु.क्र.0724-2452730
4)  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम, प्रशासकीय इमारत, रुम क्र.106- जिल्हाधिकारी कार्यालय, काटा रोड, वाशिम दु.क्र.0725-231173
5)   जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बुलडाणा, सहकार संकुल बोथा रोड, बुलडाणा. दु.क्र.07262-242336
6)   जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ, दगडी इमारत, सहकार भवन, तहसिल चौक, यवतमाळ. दु.क्र.07232-244460
अधिक माहिती करीता वरील विभाग किंवा विभागाच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था अमरावती यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती