जिल्हा दक्षता समीतीची सभा संपन्न
       अमरावती, दि.8 (जिमाका) : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा आज निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यामध्ये  प्राथम्याने पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये अनेक प्रकरणात दोषारोप पत्र तयार असुन पडताळणी अभावी न्यायालयात दाखल करण्यात आले नाहीत. त्यामुळे तपासावर असलेल्या प्रकरणांची संख्या जास्त दिसते. या अनुषंगाने प्रकरणांचा पाठपुरावा करुन तातडीने निकालात काढण्याची कारवाई करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले. या बैठकीमध्ये 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2016 अखेर दाखल गुन्हे व मंजुर अर्थ सहाय्याची माहिती सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांनी दिली. त्यामध्ये शहरी व ग्रामीण भाग मिळुन एकुण 129 प्रकरणे अनुसुचित जाती-अनुसुचित जमाती प्रतिबंधित कायद्यांन्वये दाखल झालेली आहेत. पैकी 31 जुलै 2011 अखेर 91 प्रकरणांमध्ये पिडीतांना 46 लक्ष ऐवढे अर्थसहाय करण्यात आले आहे. पोलीस तपासावर एकुण 27 प्रकरणे आहेत. 1 एप्रिल 2016 ते 31 जुलै 2016 पर्यत एकुण 45 प्रकरणे दाखल झाली असुन अर्थ सहाय्याकरीता 9 मंजुर करण्यात आली आहे. त्यांना 4 लक्षचे अर्थ सहाय मंजुर करण्यात आले. जुलै अखेर अर्थ सहाय्यासाठी एकही प्रकरण प्रलंबित नसल्याची माहिती सहायक आयुक्तांनी दिली. 1995 ते जुलै 2016 अखेर एकुण 1258 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 357 कोर्ट प्रकरणे प्रलंबित आहे. सोबतच साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारासाठी दोन व्यक्ती व एक संस्था यांचे प्रस्ताव समाज कल्याण आयुक्तालयात पाठविण्यात आले आहे. दादासाहेब गायकवाड पुरस्कारासाठी दोन प्रस्ताव व संत रविदास पुरस्कारासाठी एक प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्तांनी दिली. या बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/सागर/दि.08-08-2016/1.47 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती