राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे येथे
अमरावती प्रदेशातील 8 वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
वनसंरक्षण, वन व वन्यजीव व्यवस्थापन व वनविस्तार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य

       अमरावती,दि.16(जिमाका): वनसंरक्षण,वन्यजिव व्यवस्थापन व वनविस्तार क्षेत्रात सन 2013-14, 2014-15 या वर्षात उत्कृष्ट  कामगिरी करणाऱ्या अमरावती प्रदेशातील 8 वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुवर्ण व रजत पदके देऊन मा.राज्यपाल  सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते यशदा पुणे येथे नुकतेच गौरविण्यात आले अशी माहिती मुख्य वन संरक्षक संजीव गौड यांनी दिली.
          या समारंभास वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) सर्जन भगत यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
          गौड म्हणाले की, मा.राज्यपाल महोदयांच्या हस्ते पुणे येथे झालेल्या गौरव समारंभात राज्यातील एकुण 48 अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. मा.राज्यपाल यांच्या हस्ते असा कार्यक्रम राज्यात प्रथमच पार पडला आहे. वन मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन करुन भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करण्याचा यावेळी संदेश दिला.
अमरावती प्रदेशातील 8 अधिकारी आणि कर्मचारी आहेत. यामध्ये निरंजन विवरेकर, सय्यद सलीम, गणेश माधव हिंगणीकर, परिक्षित डंभारे यांना सुवर्ण पदक तसेच शंकर बाबाराव बारखडे, अमोल चौधरी, सतिश दिलीप राठोड, राजेश घागरे यांना रजत पदक प्राप्त झाले.
          मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वन संरक्षक डॉ.दिनेशकुमार त्यागी, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) अमरावती संजीव गौड यांनीही पदक प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती