राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील 19 ऑगस्ट रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.18 : गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.19 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि. 19 ऑगस्ट, 16 रोजी  सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, परतवाडा येथे आगमन, प्रा. तोंडगावकर यांचे घरी सदिच्छा भेट आणि नंतर विविध स्थानिक शाळांना सदिच्छा भेट. दुपारी 1.15 वा. करजगांव ता. चांदूरबाजार येथे आगमन व भाऊसाहेब पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2 वा. शिरजगांव कसबा येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. दुपारी 2.30 वा. ब्राम्हणवाडा येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. दुपारी 3.30 वा. घाटलाडकी येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती.
          सायं. 5.30 वा. चांदूरबाजार येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 6.30 वा. माधान येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं. 7.30 वा. देऊरवाडा येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती आणि प्रा. असवार यांचे घरी सदिच्छा भेट. सोयीनुसार देऊरवाडा येथून मोटारीने अमरावती, नेर, दारव्हा, दिग्रस मार्गे पुसद कडे प्रयाण.
00000
कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांचा
19 ऑगस्ट रोजीचा अमरावती जिल्हा दौरा
       अमरावती, दि.18 : कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर हे दि. 19 ऑगस्ट, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
          दि.19 ऑगस्ट, 16 रोजी दुपारी 12.30 वाजता आगमन व जलसंधारणाच्या योजनांचा विभागीय स्तरावरुन जिल्हानिहाय आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकिस उपस्थिती. स्थळ- विभागीय आयुक्त यांचे कार्यालय, अमरावती. त्यानंतर 1.30 वा. शासकीय विश्राम गृह अमरावती आगमन व राखीव. दु.4.30 खामगाव जि.बुलडाणा कडे प्रयाण करतील.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती