Tuesday, August 9, 2016

हरिसाल (डिजीटल व्हिलेज) येथे शासकीय तंत्रनिकेतन मार्फत
ईलेक्ट्रीशियन व गारमेंट मेकिंग नि:शुल्क प्रशिक्षण
       अमरावती, दि.6 (जिमाका): भारत सरकार पुरस्कृत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना ही शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येते. या अनुषंगाने स्वयंरोजगारासाठी उपयुक्त तांत्रीक कौशल्यावर आधारित इलेक्ट्रिशियन व गारमेंट मेकिंग हे सहा महीने कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षणाचे आयोजन हरिसाल (डिजीटल व्हिलेज), ता. धारणी, जि. अमरावती. येथे सुरु करण्यात येत आहे.  
          सदर प्रशिक्षण ग्रामीण अल्प शिक्षीत युवक व युवतींसाठी असुन प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. सदर प्रशिक्षणासाठी अर्ज ग्रामपंचायत कार्यालय हरिसाल (डिजीटल व्हिलेज) येथे उपलब्ध आहे. विस्तृत माहितीसाठी इलेक्ट्रीशियन प्रशिक्षक गणेश सुकलाल मुझाल्दा मो. न. 9373393231 आणि गारमेंट मेकिंग प्रशिक्षीका जमुना कुसन्या बेठेकर मो. न. 7304928796 यांचेशी संपर्क साधावा, प्रशिक्षणार्थ्यांची निवड मुलाखत पद्धतीने करण्यात येईल, असे योजनेचे समन्वयक प्रा. एस. जे. गायकवाड व संस्थेचे प्राचार्य डी. एन. शिंगाडे यांनी कळविले आहे.  
                                                                        00000

काचावार/कोल्हे/दि.06-08-2016/07.05 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...