यावली शहिद येथे 70 साल आजादी, याद करो कुर्बानी’
विषयावर कार्यक्रमाचे आयोजन
       अमरावती, दि.8 (जिमाका): देशाच्या स्वातंत्र्य संग्राम व शहिद झालेल्या देशभक्तांच्या सौर्याबद्दल जनतेला माहिती व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अमरावती येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने 70 साल आज़ादी, याद करो कुर्बानी’या उपक्रमाच्या अंतर्गत दि.9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील यावली शहिद गावातील शहिद स्मारक विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी 11 वा. एका विशेष प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असुन यामध्ये विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, 1942 च्या आंदोलनामध्ये शहिद झालेल्या शहिदांच्या पत्नीचे सत्कार, मनोगत आणि बक्षिस वितरण आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, गट विकास अधिकारी माया वानखडे, सरपंच अलका दामले, ग्रामविकास अधिकारी संजय चौधरी तसेच गावातील माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित असणार आहेत. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/दि.08-08-2016/5.49 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती