महिला सक्षमीकरण सप्ताहानिमित्त
महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या - विभागीय आयुक्त किरण गित्ते
          अमरावती, दि.01 : राज्यभर दि.1 ते 7 ऑगस्ट, 16 पर्यंत महिला सक्षमीकरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात जमिनी संदर्भातील वादात महिलांना कमी न्याय मिळाल्याचे निदर्शनास येते यासाठी महसुल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिला सक्षमीकरण सप्ताहानिमित्त अभिलेखे तपासून महिलांना त्यांचे अधिकार मिळवून द्या असे निर्देश विभागीय आयुक्त किरण गित्ते यांनी दिले.

          येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय महसुल दिन, महिला सक्षमीकरण सप्ताह कार्यक्रमांतर्गत अमरावती महसुल विभागातील सन 2013-14 व 2014-15 या वर्षात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ व महिला लाभार्थ्यांना विविध हक्क अभिलेखांचे वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

          यावेळी अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे, महसुल उपायुक्त प्रविण पुरी, उपायुक्त पुरवठा रमेश मावसकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक आयुक्त ओमप्रकाश अग्रवाल, सहाय्यक आयुक्त जयंत अपाले, परिविक्षाधिन आयएएस राहुल कर्डिले, माजी महापौर किरणताई महल्ले आदी उपस्थित होते.

          विभागीय आयुक्त गित्ते यांनी पुरस्कार प्राप्त सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करुन गोरगरीब, दिनदुबळ्यांचे प्रश्न सोडविणे आपले कर्तव्य असुन महसुल विभागाच्या निमित्ताने चांगली संधी प्राप्त झाली आहे. शासनाची प्रतिमा उंचाविण्याची आपणास चांगली संधी प्राप्त झाली आहे. महाराजस्व अभियान, सुवर्ण जयंती अभियान, महसुल अभियान, अनुकंपाची प्रकरणे तपासुन लोकांना न्याय द्यावा. महसुल प्रशासनात नाविण्यपुर्ण उपक्रम वाढीस लागावे म्हणून पुरस्कार वितरण करण्यात येतो. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी विकासात्मक तसेच नवीन कामे हाती घेवून व्यवस्थापनाचे कौशल्य जोपासावे.

          85 टक्के निर्देश ई-मेल, व्हॉट्स ॲप आदी सोशल मिडियाद्वारे येतात. कमी वेळात ही माहिती शासनास सादर करण्यासाठी कौशल्य विकासाची आवश्यकता आहे. जनतेची गाऱ्हाणी समजुन घेवून त्यांचे समाधान करावे. समोरच्या व्यक्तीचे असमाधान हे आपले अपयश आहे. यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करावा.




          जिल्ह्यात जमिनी अभावी कोणताही प्रकल्प रखडलेला नाही असे सांगून विभागीय आयुक्त म्हणाले, जिल्ह्यात जलयुक्तचे मोठे काम झाले आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पातील साठवणूक क्षमतेच्या अर्ध्यापेक्षा जास्त साधारण 46 हजार द.ल.घ.मी. पाणी साठे जलयुक्त शिवार अभियानातुन निर्माण झाले आहेत. याशिवाय 970 पांदण रस्ते मुक्त केले. पुढील काळातही पांदण मुक्त होत आहे. अन्न सुरक्षा योजनेमध्येही उत्कृष्ट काम विभागात झाले आहे असे सांगून त्यांच्याहस्ते उपस्थित महिलांना मानवी हक्क अभिलेख व प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, दुय्यम शिधापत्रिका, सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

          यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, घाटंजीचे तहसिलदार जोरवाल, तहसिलदार श्रीकांत उंबरकर, नायब तहसिलदार राहुल वानखडे, अव्वल कारकुन उमेश निमकाळे, लिपिक सचिन बागडे, लघुलेखक महेंद्र गायकवाड, रमेश मोहोड, चंद्रकांत धकिते, मंडल अधिकारी ए.एन.डवळे, अमोल देशमुख, तलाठी महेश धानोरकर, प्रविण कावलकर, पोलिस पाटील डी.बी.वानखडे, कोतवाल दिनकर गवई, आर.के.खरात, आर.बी.नेरकर, विजय सुर्यवंशी, रमेश मोरे, अशोक जाधव, आदींचा यावेळी प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देवून गौरव करण्यात आला.  

          यावेळी माजी महापौर किरणताई महल्ले, बुलडाणाचे अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसिलदार वैशाली पाथरे, नायब तहसिलदार राहुल वानखडे, नायब तहसिलदार निकिता जावरकर स्वीय सहाय्यक महेंद्र गायकवाड यांची समयोचित भाषणे झाली. समारंभाचे सुत्रसंचालन सहाय्यक विभागीय पुरवठा अधिकारी विवेकानंद काळकर यांनी केले.
00000

काचावार/कोल्हे/गावंडे/सागर/हरदुले/दि.1-8-2016/19-10 वाजता


















 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती