पालकमंत्री पोटे यांच्याहस्ते
नरदोडा येथील शेततळे व गावतळ्यात जलपूजन

          अमरावती दि. 15 (जिमाका): महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे संजय नामदेवराव पोटे यांच्या शेतातील शेततळ्याचे तसेच गाव तलावात जलपूजन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी केले. या गावातील प्राथमिक शाळेतील व्यायाम शाळेचे उद्घाटन ही त्यांनी केले. त्यानंतर हनुमान मंदिरात आयोजित ग्राम सभेत मार्गदर्शन केले.  
          या बैठकीस आ.रमेश बुंदिले, रोहयो उपजिल्हाधिकारी काळे, उपविभागीय अधिकारी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
          ना.पोटे म्हणाले, शासन शेवटच्या घटकापर्यंत योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. दरवर्षी आपण टंचाईला सामोरे जातो. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आपल्या गावात पडणारे पाणी आपल्याच गावात जिरविण्यासाठी शोष खड्डे ही योजना अतिशय उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत सर्वांनी शोषखड्डे घ्यावेत. तसचे शौचालय बांधकामाची योजना, रोपवाटिका, वृक्षलागवड, फळबाग लागवड या योजनाही घेण्याची गरज आहे. गावाचे हित पाहणाऱ्या किमान 10-12 लोकांनी पुढे येवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
          अमरावती जिल्ह्यात 2 लाख 24 हजार लोकांना कृषि विमा योजनेचा लाभ मिळाला आहे असे सांगून मागेल त्याला घर, मागेल त्याला शेततळे ही योजना घराघरात राबविण्याचे शासनाची योजना आहे. त्यादृष्टीने शासन पुरेपूर प्रयत्न करते याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन पोटे यांनी केले. यावेळी लाभार्थ्यांना धनादेश वाटप ना.पोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.बुंदिले यांनी गावाच्या विकासाचे प्रश्न मांडले
00000

काचावार/गावंडे/सागर/15-08-2016/15-30 वाजता





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती