Posts

Showing posts from December, 2020

31 डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

Image
  31   डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना                                                   नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने करावे -           जिल्हाधिकारी शैलेश नवाल अमरावती, दि. 30 :  कोविड    - 19   मुळे उद्भवले ली  संसर्गजन्य परिस्थिती लक्षात घेऊन नूतन वर्षाच्या स्वागतानिमित्त शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी   31   डिसेंबर   2020   व नूतन वर्षाचे स्वागत घरीच राहून अत्यंत साधेपणाने करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.              आपत्ती व्यवस्थापन प्रतिबंध कायद्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात 31 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश यापूर्वीच लागू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, अमरावती महानगरपालिका क्षेत्रात पाच जानेवारीपर्यंत रात्री 11 पासून ते सकाळी सहापर्यंत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  कोरोनाच्या अनुषंगाने उद्या ( 31   डिसेंबर)   रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि.   1   जानेवारी   2021   रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराब

नामनिर्देशन पत्रे आता पारंपारिक पध्दतीने स्विकारणार

Image
ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 नामनिर्देशन पत्रे आता पारंपारिक पध्दतीने स्विकारणार निवडणूक शाखेची माहिती अमरावती, दि. 29 : ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे पारंपारिक पध्दतीने ऑफलाईन स्विकारण्यात येत आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची वेळ देखील 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. नामनिर्देशन व घोषणापत्रे यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना संबंधित कार्यालयातून उपलब्ध करुन देण्यात येतील. पारंपारिक पध्दतीने स्विकारण्यात आलेले नामनिर्देशन पत्रे छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशन पत्रे संगणक चालकाच्या मदतीने आरओ लॉगीन मधून भरुन देण्यात येतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे. जात पडताळणीसाठीचे प्रस्तावही ऑफलाईन पध्दतीने छाननीच्या दिनांकापर्यंत स्विकारण्यात येत आहे, असेही कळविण्यात आले आहे. त्यानुसार अर्जदाराची संख्या लक्षात घेता कार्यालय पूर्ण वेळ व सर्व अर्जदारांचे अर्ज स्विकारेपर्यंत सुरु ठेवावी, असे निर्देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्

प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पथके - निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे

Image
   15 ते 30 जानेवारीदरम्यान जनजागृती पंधरवडा प्राणी क्लेश प्रतिबंध   कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पथके                                                    - निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे   अमरावती, दि. 29 :    जनावराची अवैध वाहतूक आदी नियमभंग करणाऱ्या बाबी निदर्शनास येताच तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहर व ग्रामीण स्तरावर पथके (स्कॉड) निर्माण करावीत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी आज येथे दिले. या कायद्याबाबत जनजागृतीसाठी 15 ते 30 जानेवारीदरम्यान पंधरवडा साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्हास्तरीय   प्राणी   क्लेश   प् रतिबंधक   समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली, त्यावेळी ते बोलत होते.   समितीचे अशासकीय सदस्य नंदकिशोर गांधी, महेश देवळे, चंद्रशेखर कडू, डॉ. सुनील सूर्यवंशी, अभिषेक मुरके, विजय शर्मा, अजित जोशी, श्रीमती सुरेखा पांडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, पशु

सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय पुनर्वसनाच्या कामांनाही गती मिळणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धासह विविध प्रकल्पाच्या कामांना नियामक मंडळाची मान्यता सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय पुनर्वसनाच्या कामांनाही गती मिळणार -  पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर   अमरावती ,  दि. १ : जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी ऊर्ध्व वर्धा ,  निम्न पेढीसह विविध प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे व निधीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळाली असून त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. पुनर्वसनाची कामेही गतीने पूर्ण होतील ,  असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले.   गुरुकुंज मोझरी ,  पाथरगाव ,     सिंचन योजनेच्या समावेशासह कौंडण्यपूर धारवाडा पुलासाठी ७५ लाख रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्णत्वास जाऊन सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा होत आहे. पुनवर्सनाच्या कामाबाबतही पालकमंत्र्यांनी विविध गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेऊन प्

पालकमंत्र्यांकडून केंद्रीय खाद्य, सार्वजनिक वितरण मंत्र्यांसह विविध मान्यवरांना निवेदन

Image
  पालकमंत्र्यांकडून केंद्रीय खाद्य, सार्वजनिक वितरण मंत्र्यांसह विविध मान्यवरांना निवेदन आधारभूत खरेदी योजनेत मका खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून मिळावे -                    पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अमरावती, दि. 28 : आधारभूत खरेदी योजनेपासून जिल्ह्यातील मका पीक उत्पादक शेतकरी बांधव वंचित राहू नये म्हणून खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय रेल्वे तथा उपभोक्ता कार्य, खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांना केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या प्राप्त उद्दिष्टानुसार शेतक-यांच्या मका पीकाची खरेदी सुरू झालेली असताना उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यासह विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर अनेक शेतकरी बांधवांचा मका खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचा एक मोठा वर्ग यापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या परिस्थितीचा विचार करता मका पीकाचे उद्दिष्ट वाढवून द्यावे, अशी विनंती पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी केंद्रीय खाद्य व सार्वज

मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन

Image
मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन हजारो लोकांच्या उपस्थितीत शहिद कैलास दहिकर यांना भावपूर्ण निरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित   अमरावती, दि. 27 : हिमाचलात कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या कैलास दहिकर यांना आज हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. भारतीय सैन्यातर्फे  व जिल्हा पोलीस दलातर्फे यावेळी शहिद दहिकर यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलीस दलातर्फे तीन फैरी झाडून शहिद दहिकर यांना सलामी देण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, खासदार नवनीत राणा, आमदार राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार मदन जाधव यांनी पुष्पचक्र वाहून शहिद कैलास दहिकर यांना श्रद्धांजली वाहिली. अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हे कुलू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते. रात्री रॉकेल हिटरमुळे टेंटला आग लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव शिमला- चंदीगड येथून दिल्ली व दिल्लीहून विमानाने नागपूर येथे व नागप

'इर्विन'मध्ये हृदयरोग, कर्करोग निदान व उपचारासाठी ओपीडी

Image
  'इर्विन'मध्ये हृदयरोग, कर्करोग निदान व उपचारासाठी ओपीडी गरीब व गरजू रुग्णांसाठी सुविधा -          जिल्हाधिकारी शैलेश नवाल                   अमरावती, दि. 24 : जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना हृदयरोग, कर्करोग सारख्या मोठ्या आजारावर तत्काळ वैद्यकीय उपचार सुविधा मिळावी यासाठी जिल्हा राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात हृदयरोग व कर्करोगासंबंधी निदान व उपचारासाठी ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ओपीडीच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांनी येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे केले.              शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील श्री गजानन महाराज व साई महाराज मंदिरामागील परिसरात स्थापित कर्करोग व हृदयरोग ओपीडीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण सोनवणे, कर्करोग तज्ज्ञ डॉ. वैभ

अल्पसंख्याक तरूणांना पोलीस भरती पूर्वप्रशिक्षण

Image
    अल्पसंख्याक तरूणांना पोलीस भरती पूर्वप्रशिक्षण                                       जिल्ह्यातील अधिकाधिक तरूणांनी लाभ घ्यावा -          जिल्हाधिकारी शैलेश नवाल *सहा जानेवारीला ‘एचव्हीपीएम’ परिसरात निवड चाचणी अमरावती, दि. 23 : जिल्ह्यातील अल्पसंख्याक तरूणांना पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून अधिकाधिक पात्र तरूणांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.           जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छूक उमेदवारांना हे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण 50 दिवसांचे असेल. त्यात रोज तीन तास वर्ग प्रशिक्षण व दोन तास मैदानी प्रशिक्षण असेल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान दीड हजार रूपये विद्यावेतन देण्यात येईल, तसेच प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येईल. प्रशिक्षणार्थ्याला गणवेश, बूट आदी गणवेश साहित्यासाठी एक हजार रूपये एकरकमी अनुदान दिले जाईल. निवासाची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांना स्वत: करावी लागेल. उमेदवार बारावी उत्तीर्ण, शारिरीकदृष्ट्य

पुढील पंधरवडाभर अधिकची सतर्कता अमरावती शहरात रात्र संचारबंदी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
  ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार पुढील पंधरवडाभर अधिकची सतर्कता अमरावती शहरात रात्र संचारबंदी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल               अमरावती, दि. 21: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.   अमरावती महानगरपालिकेच्या क्षेत्रात 22 डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत रात्री 11 वाजतापासून सकाळी सहा वाजतापर्यंत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे.                   ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे.   कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून यापूर्वीच संचारबंदी लागू होती. तथापि, व्यवसाय सुलभता निर्माण करण्यासाठी मिशन बिगिन अगेन धोरणांतर्गत दक्षता नियमांचे पालन करण्याच्या अटीसह टप्प्याटप्प्याने शिथीलता आणण्यात आली. त्यावेळी पारित केलेले सर्व आदेश व सूचना 31 डिसेंबरपर्यंत