Posts

Showing posts from March, 2017
Image
आधुनिक तंत्रज्ञान व कर्तव्यनिष्ठेने टी.बी.वर मात करू जिल्हाधिकारी अमरावती, दि. 24 : आधुनिक तंत्रज्ञान व टीबी निर्मुलनासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा यांनेच आपण टीबी रोगावर मात करू शकतो असे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मांडले. स्थानिक क्षयरोग रुग्णालय परिसरात आयोजित जागतीक क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी, समाजसेवक गोंविद कासट, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अरुण राऊत, डॉ.विलास जाधव,डॉ.नितीन भालेराव डॉ.वसंत लुंगे, क्षयरोग अधिकारी डॉ.निकोसे, डॉ विनोद देशमुख उपस्थित होते.   सुरूवातीला क्षयरोग निर्मुलनाकरीता लसीचे संशोधक रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. टि.बी निर्मुलनाकरीता पथनाट्य सादर करण्यात आले. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते टी.बीच्या माहिती देणाऱ्या स्टॉलचे व पोस्टर प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले.   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी यांनी रेबीज,देवी,पोलीओ यासारखाच  टीबी आता निर्मुलनाच्या उंबरठयावर असल्याचे सांगी
Image
 केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत उत्कृष्ट कामे करणार पालकमंत्री अमरावती दि.20 (जिमाका) : केंद्रीय मार्ग निधी योजनेतर्गत मिळालेला निधी हा पुर्णपणे विकासकामासाठी खर्च करणार व यातुन उत्कृष्ट कामे करणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज केले. पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत  आज शहरातील रेल्वे स्टेशन ते इर्विन चौक   व चांदुररेल्वे   रस्त्याची सुधारणा कामाचे भुमीपूजन संपन्न्‍ झाले.यावेळी आमदार डॉ.सुनिल देशमुख व  नगरसेवीका,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी  जाधव उपस्थित होते.  केंद्रीय भुतल परिवहनमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानुन पालकमंत्री म्हणाले की केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मिळालेलया निधीव्दारे होणारी कामे ही दर्जेदार व्हावीत.यावेळी आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी शहरातील विकासासाठी मिळालेल्या निधी चा वापर करून शहराचा कायापालट करणार असल्याचे सांगीतले. 00000
Image
व्यसनमुक्तीसाठी प्रसारमाध्यमांची  महत्वाची जबाबदारी *व्यसनमुक्तीसाठी साहित्यीक व प्रसार माध्यमांची जबाबदारी परिसंवादातील वक्तयांचा सूर अमरावती दि.20 (जिमाका): व्यसनमुक्तीसाठी प्रसारमाध्यमांची जबाबदारी मोठी असुन प्रसारमाध्यमातुनच व्यसनमुक्तीबाबत जाणीवजागृती करता येईल असे मत आज पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनातील परिसंवादात मांडण्यात आले.  संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचा आजचा दुसरा दिवस होता.   व्यसनमुक्तीसाठी साहित्यीक व प्रसार माध्यमांची जबाबदारी  व  संत साहित्यातील व्यसनमुक्तीचा संदेश या दोन्ही परिसंवादात  अभिनेत्री मधुरा वेलनकर, नितिन कुळकर्णी, सचिन परब, प्राध्यापक अरविंद देशमुख, डॉ.हेमंत खडके यासह कवी श्यामसुंदर सोन्नर, डॉ.दिपक पुनसे उपसिथत होते. गुरूदेव मासिकाचे संपादक डॉ.दीपक पुनसे यांनी ग्रामगीतेतील तुकडोजी महाराजांच्या चरणाव्दारे व्यसनमुक्तीचा संदेश समजावुन सांगीतला. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम एक दिवसाचा न राहता ती एक निरंतर प्रकीया राहावी. डॉ.
Image
प्रत्येकाने व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ घ्यावी - सत्यपाल महाराज * देशातील पाचवे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचे थाटात उद्घाटन * व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या 51 संस्था व व्यक्तींना पुरस्कार * चर्चासत्राच्या माध्यमातून व्यसनाधिनतेवर प्रकाश व जनजागृती अमरावती दि.19 (जिमाका) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेल्या समान हक्कामुळे आज व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाच्या अध्यक्षा म्हणून महिलांना संधी मिळाली आहे. त्याच बरोबर समाजाच्या व्यसनमुक्तीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर, संत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज या महापुरुषांनी केलेले कार्य पुढे नेण्याचे एक छोटे काम मला सोपविण्यात आले आहे. हे काम सर्व समाजाचे असुन त्यासाठी प्रत्येक व्यक्तिने एकातरी व्यसनाधिन व्यक्तीला व्यसनमुक्त करण्याची शपथ या निमित्ताने घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन देशातील पाचव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलनाचे संम्मेलनाध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.  संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य