Posts

शासकीय तंत्रनिकेतन येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षण

  शासकीय तंत्रनिकेतन येथे नि:शुल्क रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर प्रशिक्षण           अमरावती, दि. 06 (जिमाका): भारत सरकार पुरस्कृत कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय व केंद्रिय प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजना शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे राबविण्यात येत. स्वंयरोजगारासाठी उपयुक्त तांत्रिक कौशल्यावर आधारित रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडिशनर या कोर्ससाठी सहा महिने कालावधीचे नि:शुल्क प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतन येथे होणार आहे.                सदर प्रशिक्षण ग्रामिण अल्प शिक्षित युवक व युवतींसाठी असुन प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही.   प्रशिक्षणासाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असून मुलाखतीव्दारे प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलमेंट थ्रु पॉलिटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतीगृह समोर, शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य डॉ. व्हि. आर. मानकर व योजनेचे समन्वयक प्रा.एम. डब्ल्यु. ठाकरे यांनी केले आहे. 00000

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

Image
  अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन              अमरावती, दि. 06 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पानपोईजवळ, इर्विन चौक येथे सापडला. मृतकाचे अंदाजे वय 32 वर्षे असून मृतकाचा रंग गोरा, चेहरा लाबंट, केस काळे, दाढी मिशी बारिक, अंगात पांढरा रंगाचा फुलबाह्याचा शर्ट निळा रंगाचा बरमुडा घातलेला होता.   मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा सुरेश चिमोटे यांचा भ्रमणध्वनी क्रं. 8975349961 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे. 00000

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

  शहरात   कलम 37 (1)   व (3) लागू               अमरावती, दि. 03 (जिमाका) :   शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त   (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.               सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात आला असून    दि. 6 ते 20 मे 2024 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त (अमरावती शहर)   नविनचंद्र रेड्डी   यांनी कळविले आहे. 000000  

महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि. 15 जूनपर्यंत मुदतवाढ

  महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यास दि. 15 जूनपर्यंत मुदतवाढ                 अमरावती दि. 03 (जिमाका) :   सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे   विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास शनिवार दि. 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे.               सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी   भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,   शिक्षण फी   परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज   गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.             माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2023-24 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी नवीन अर्ज भरण्यासाठी तसेच सन 2022-23 साठी रि-अप्लाय करण्यासाठी   दि. 15 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा सत्कार; मतदानाचा टक्का वाढविण्यात प्रत्येकांचे योगदान- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Image
  लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा सत्कार; मतदानाचा टक्का वाढविण्यात प्रत्येकांचे योगदान- जिल्हाधिकारी सौरभ कटियार           अमरावती, दि. 3 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविणारे प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक, शैक्षणिक संस्था व स्वयंसेवी संस्थाच्या प्रयत्नाने अमरावती लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत ऐतिहासिक नोंद केली आहे. ही बाब निश्चितच अमरावती जिल्हा प्रशासनाला व ही कामगिरी करणाऱ्या प्रत्येक घटकाला भूषणावह आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मतदानाचा टक्का वाढविणाऱ्या शिलेदारांचा सत्कार सभारंभात केले.              लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत स्विप अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्था व कार्यालये यांच्या कार्यगौरव सोहळाचे जिल्हा नियोजन भवन येथे आज आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, सहायक जिल्हाधिकारी नरेश अकुनूरी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, स्विपचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळा

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (विठ्ठलराव गुलाबराव मैदनकर)

Image
  हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (विठ्ठलराव गुलाबराव मैदनकर)               अमरावती, दि. 02 (जिमाका):   येथील   विठ्ठलराव गुलाबराव मैदनकर   (वय 59 वर्षे, रा. धनगरपुरा, नांदगाव पेठ, अमरावती ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.              विठ्ठीलराव गुलाबराव मैदनकर   हे दि. 13 एप्रिल, 2024 रोजी घरून कोणालाही न सांगता घरून   निघून गेले. त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण निमगोरा, उंची पाच फूट 1 इंच, उजव्या हातावर विठ्ठल व नागाचे चित्र गोंदलेले, घरून जातेवेळी   अंगात पांढरे रंगाचा शर्ट, निळा रंगाचा फुल पँन्ट   घातलेले   होते. केस बारिक पायात पिवळा पांढरा रंगाचा बुट घातलेला होता. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. 0000

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (शुभम दामोदर राऊत)

Image
  हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (शुभम दामोदर राऊत)               अमरावती, दि. 02 (जिमाका):   येथील   शुभम दामोदर राऊत   (वय 27 वर्षे, रा. यावलपूरा, नांदगाव पेठ, अमरावती ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.             शुभम दामोदर राऊत   हे दि. 14 एप्रिल, 2024 रोजी बॅग भरून काहीन सांगता घरून   निघून गेले. त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण सावळा, उंची 5 फूट 8 इंच, बांधा सडपातळ, घरून जातेवेळी   अंगात पांढरे शर्ट, सोबत बॅग, निळा रंगाचा जिन्स   घातलेले   होते. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. 0000