Thursday, May 2, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (विठ्ठलराव गुलाबराव मैदनकर)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (विठ्ठलराव गुलाबराव मैदनकर)

 

            अमरावती, दि. 02 (जिमाका):  येथील  विठ्ठलराव गुलाबराव मैदनकर  (वय 59 वर्षे, रा. धनगरपुरा, नांदगाव पेठ, अमरावती ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

           विठ्ठीलराव गुलाबराव मैदनकर  हे दि. 13 एप्रिल, 2024 रोजी घरून कोणालाही न सांगता घरून  निघून गेले. त्यानंतर शोध घेतला असता ते सापडले नाहीत. त्यांचा वर्ण निमगोरा, उंची पाच फूट 1 इंच, उजव्या हातावर विठ्ठल व नागाचे चित्र गोंदलेले, घरून जातेवेळी  अंगात पांढरे रंगाचा शर्ट, निळा रंगाचा फुल पँन्ट  घातलेले  होते. केस बारिक पायात पिवळा पांढरा रंगाचा बुट घातलेला होता. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...