अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 06 (जिमाका): पोलिस ठाणे
सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पानपोईजवळ, इर्विन चौक
येथे सापडला. मृतकाचे अंदाजे वय 32 वर्षे असून मृतकाचा रंग गोरा, चेहरा लाबंट, केस
काळे, दाढी मिशी बारिक, अंगात पांढरा रंगाचा फुलबाह्याचा शर्ट निळा रंगाचा बरमुडा घातलेला
होता.
मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची
ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा
सुरेश चिमोटे यांचा भ्रमणध्वनी क्रं. 8975349961 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे
आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment