Tuesday, May 14, 2024

नाशिक येथे प्रेरणा रॅलीचे आयोजन; जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा

 

नाशिक येथे प्रेरणा रॅलीचे आयोजन;

जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा

 

            अमरावती, दि. 14 (जिमाका) : बॉईज स्पोटर्स कंपनी आर्टीलरी सेंटर नाशिक रोड येथे दि.17 ते दि.19 मे 2024 या कालावधीत साधारण व सिध्द खेळाडूंना स्पोटर्स कॅडेट म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रेरणा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीकरिता जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवाल यांनी केले आहे.

 

           या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंची वयोमर्यादा 08 ते 14 वर्षे असून यासाठी सहा रंगीत पासपेार्ट फोटो तसेच जन्मपत्र, जात प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, अधिवास प्रमाण पत्राच्या मूळ प्रती आणि जिल्हा पातळीवर खेळले असल्यास त्या खेळाचे मूळ प्रमाणपत्र ही लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...