Posts

Showing posts from July, 2023

ग्रामीण भागात कलम 37 (1) व (3) लागू

ग्रामीण भागात  कलम 37 (1)  व (3) लागू             अमरावती, दि. 31 :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून   दि. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  विवेक घोडके  यांनी कळविले आहे. 00000  

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.7) लोकशाही दिनाचे आयोजन

  जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.7) लोकशाही दिनाचे आयोजन            अमरावती, दि. 31 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन ऑगस्ट महिण्याचे पहिल्या सोमवारी म्हणजे दि. 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 1 वाजता आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय कार्यालयाच्या निगडित तक्रारी, गाऱ्हाणी संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे. 00000

वनविभाग भरती परीक्षेबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वन विभागाचे आवाहन

वनविभाग भरती परीक्षेबाबत समाज माध्यमांवरील संदेश चूकीचा ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे वन विभागाचे आवाहन +  अमरावती ,  दि.  30 -   वन विभागामार्फत भरती प्रक्रिया दि.  31  जुलै ते  11  ऑगस्ट  2023  दरम्यान विविध परिक्षा केंद्रावर लेखी परिक्षाचे आयोजन करण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेतील वनरक्षक पदाच्या परिक्षेसाठी पेपर लिक करुन खाजगी केंद्रामध्ये ज्याची परिक्षा आहे ,  त्यांना पेपरमध्ये मदत करण्यासंदर्भातील संदेश विविध समाज माध्यमांवर प्रसारीत होत आहे.  खात्याकडून घेण्यात येत असलेली परिक्षा ही टीसीएस यांचे माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. त्यामुळे समाज माध्यमावर प्रसारीत होत असलेले संदेश आणि अफवांवर परिक्षार्थींने/नागरिकांनी विश्वास ठेवू नये ,  असे आवाहन अमरावती वन विभागाचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांनी केले आहे.              प्रसारित होत असलेल्या संदेशासंदर्भात पोलीस विभागाकडे तक्रार करण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील परिक्षार्थींना कोणत्याही प्रकारची माहिती मिळाल्यास पुराव्यानिशा या कार्यालयाकडे किंवा पोलिस विभागाशी संपर्क साधावा ,  असेही आवाहन वन विभागाव्दारे करण्यात

ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Image
  ग्रामीण भागाच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण उद्योगांची उभारणी करा -     केंद्रीय मंत्री नितीन गडकरी   अमरावती, दि. 28 : आदिवासी, ग्रामीण व आर्थिक दुर्बल घटकांच्या विकासासाठी उद्योगपूरक व्यवसायांची निर्मिती आवश्यक आहे. यासाठी अशा भागात नाविण्यपूर्ण उद्योगांच्या उभारणीसाठी उद्योग समूहाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.             एमआयडीसी येथील ग्रीन फॅब सोलर खादी प्रोसेसिंग क्लस्टरच्या सोलर चरखा कॉमन फॅसिलिटी सेंटरच्या टेक्सटाईल डिजिटल प्रिंटिंग युनिटचे उद्घाटन श्री. गडकरी यांच्या हस्ते   झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय, खादी ग्राम उद्योगाचे संचालक रविंद्र साठे, एमएसएमईचे संचालक पी.एम.पार्लेकर, सहसंचालक सतिश शेळके, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, अमरावती इंड्रस्टीज असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातूरकर, प्रदीप चेचरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.           केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, आपला देश शेती प्रधान आहे. निसर्गाच्या लहरीपण

शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Image
  गोकुलम गोरक्षण संस्थेच्या चिकित्सालयाचे उद्घाटन शेतकरी उत्पादन कंपन्या स्थापन करा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी   अमरावती, दि. 28: शेतकी उत्पादनासोबतच पूरक व्यवसायावर भर द्या. शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करुन गुरांच्या चाऱ्यांचे उत्पादन घ्या. जेणेकरुन वर्षभर पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होईल. महागड्या पशुखाद्याला पर्याय म्हणून मका, सोयाबिन, तांदुळाच्या चुरीपासून पशु खाद्य निर्माण करण्यावर भर द्या, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नांदुरा बु. येथील गोकुलम गोरक्षण संस्थेच्या अत्याधुनिक पशु चिकित्सालय, पशु मोबाईल ॲम्बुलन्स तसेच पक्षीघराचे लोकार्पण श्री. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.           खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्यासह जीव जंतु मुंबई कल्याण मंडळाचे सदस्य गिरीशभाई शहा, श्रीमद राजचंद्र जीवदया ट्रस्टचे रतनभाई लुनावत, आदीजीन युवक चॅरिटेबल ट्रस्टचे जयेशभाई शहा, मेहता चॅरिटेबल ट्रस्टचे विजयभाई वोरा, भरतभाई मेहता, गोसेवा आयोग महाराष्ट्र शासनाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, डॉ. हेमंत मुरके, डॉ

गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Image
  विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या -      केंद्रीय मंत्री नितीन गडकरी   अमरावती, दि. 28 : शंभर वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकडे वाटचाल होत आहे.   तंत्रज्ञानात होणाऱ्या नवनवीन अविष्कारांचा वेध घेवून संस्थेने गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.            विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचा शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या केशवराव भोसले सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे पाटील, माजी आमदार बी.टी. देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यान्थन, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, उच्च शिक्षण सहसंचालक नलिनी टेंभेकर, व्हीएमव्ही संस्थेच्या संचालिका डॉ. अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उप

शिकस्त शाळा इमारतीची माहिती आकस्मित कक्षाला कळवा;शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन

  शिकस्त शाळा इमारतीची माहिती आकस्मित कक्षाला कळवा;शिक्षणाधिकाऱ्यांचे आवाहन                अमरावती, दि. 27 :  पळझड व बाध‍ित झालेल्या शाळांची माहिती देण्यासाठी आकस्मिक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतंर्गत प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयाच्या धोकादायक व शिकस्त इमारतीची माहिती आकस्मित कक्षाला कळवा, असे आवाहन जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी केले आहे.             जिल्हा परिषदेतंर्गत असलेल्या शाळा, इमारती धोकादायक स्थितीत असतील, अशा वर्ग खोल्याचे पर्यायी सुस्थितीत ठिकाणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक यांना दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हापरिषदेतील शिकस्त व धोकादायक  शाळेच्या वर्ग खोल्या पर्यायी ठिकाणी म्हणजेच गावातील समाज मंदिर, अंगणवाडी केंद्र, मंदिर संस्थान किंवा सुस्थितीत असलेल्या खाजगी इमारतीत  व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आकस्मिक  कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यातील धोकादायक व शिकस्त शाळा, इमारतीबाबत सूचना असल्यास किंवा मदतीची गरज असल्यास दुरध्वनी क्रम

सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण; इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

  सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण;  इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन        अमरावती, दि. 27 :  छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत कौशल्य विकास सोसायटी मार्फत सारथीच्या लक्षीत गटातील उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अ. स. ठाकरे यांनी केले आहे.           सारथी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, विकास सोयासटी मार्फत उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. सारथीच्या लक्षीत गटातील (मराठा, कुणबी मराठा, व कुणबी-मराठा) उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 800 उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील स्कील इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमासाठी 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, ट्र

खादी व ग्रामोद्योग मंडळ;मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

  खादी व ग्रामोद्योग मंडळ;मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन                अमरावती, दि.27:   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली    आहे. या योजनेमध्ये मध उद्योगासाठी मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक, शासनाची हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धन इत्यादी बाबी लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.  इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी मध केंद्र योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.   वैयक्तिक मधपाळ मध केंद्र योजनेनुसार वैयक्तिक मधपाळ अर्जदार हा साक्षर असावा. तसेच त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.    स्वत:ची शेती असल्यास त्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येईल.   केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त     असावे. अशा व्यक्तीच्या नावे किमान एकर जमीन अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत-जमीन किंवा भाडे तत

चांदुर बाजार तहसिल कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

Image
  चांदुर बाजार तहसिल कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट अमरावती दि.27 :  जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकतीच चांदुर बाजार  तहसिल कार्यालयाला भेट देऊन विविध विभागाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित होते. तहसिलदार कार्यालयातील विविध विभागाना भेटी देऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी दिल्या. त्यानंतर चांदुर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील पुलाच्या बांधकामास भेट देवून उपविभागीय अभियंता यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पुर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी, कर्मयोगी गाडगेबाबांची कर्मभूमी नागरवाडी,  आश्रमशाळा तसेच कलादालनास भेट दिली. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी, चांदुर बाजार तहसीलदार, नायब तहसीलदार, कार्यकारी अभियंता, उपअभियंता  कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. 000000  

पीएम किसान सन्मान निधीचा १४वा हप्ता खात्यावर होणार जमा

Image
पीएम किसान सन्मान निधीचा १४वा हप्ता आज खात्यावर होणार जमा        अमरावती, दि.२६ (जिमाका): केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअतंर्गत पात्र लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी उद्या , गुरुवार,दि. 27 जुलै 2023 रोजी राजस्थान येथील सिकर येथे भव्य संमेलन आयोजित केले आहे. या समारंभाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.      या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी https://pmevents.ncog.gov.in ही वेबकास्ट लिंक उपलब्ध आहे. जिल्ह्यातील जास्तीत -जास्त शेतकऱ्यांनी मोबाईलवरुन ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके यांनी केले आहे.   00000

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत

  डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत          अमरावती, दि. 26 : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2023-24 अंतर्गत ज्या मदरशांना आधुनिक शिक्षणासाठी शासकीय अनुदान हवे आहे, त्यांनी 10 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.        डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी मदरशांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, ऊर्दू हे विषय शिकविण्यासाठी शिक्षकांना मानधन, पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान, मदरशांमध्ये राहून शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती या बाबींची माहिती नमुन्यात सादर करावी. इच्छुक मदरशांनी शासन निर्णय दि. 11 ऑक्टोबर 2013 अन्वये नमुद केलेल्या विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथील अल्पसंख्यांक शाखेत दि. 10 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रस्ताव दोन प्रतीमध्ये कार्यालयीन वेळेत सादर करावा. शासन निर्णयातील तरतुदीनुसार जास्तीत जास्त त

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन ( गौरव विष्णु काळकर)

  हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन ( गौरव विष्णु काळकर)   अमरावती, दि. 26 :   येथील   गौरव विष्णु काळकर    (वय 25 वर्षे, रा. कुंभारवाडा, खोलापुरी गेट, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. गौरव विष्णु काळकर   हे दि. 31 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी   9 वाजता कुंभारवाडा, खोलापुरी गेट येथून घरून कामावर जातो असे सांगितले व   कोठेतरी निघून गेले आहे. शोध घेतला असता ते सापडले नाहीत.   त्यांचा वर्ण गोरा, उंची पाच फूट सात इंच, बांधा मजबूत, घरून जातेवेळी   अंगात पांढरा जिन्स पॅन्ट, ऑरेंज रंगाचे फुल बाह्यांचे शर्ट   घातलेले होते. उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात (0721)-2678133   या दूरध्वनी क्रमांकावर   किंवा संजय लोंदे   8055226211 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.  

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ’ घेणार घरभेटी उपविभागीय अधिकारी यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

  मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी ‘बीएलओ ’ घेणार घरभेटी उपविभागीय अधिकारी यांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन   अमरावती, दि.26:   मतदार यादी अद्ययावत व अचूक होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन मतदारांच्या तपशीलाची पडताळणी कुटुंब प्रमुखांकडून करून घेणार आहेत. त्यांना नागरिकांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन दर्यापूर उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांनी केले आहे. दर्यापूर विधानसभा मतदार संघ अंतर्गत एकुण बीएलओ पर्यवेक्षक 20, एकुण बीएलओ 341 व एकुण मतदार केंद्र 341 आहेत. तसेच दर्यापूर विधानसभा मतदार संघामध्ये एकुण पुरूष मतदार 1 लाख 53 हजार 650 एकुण स्त्री मतदार 1 लाख 42 हजार 323 तर एकुण तृतीय पंथी मतदार 4 असे एकुण मतदार संख्या 2 लाख 95 हजार 977 आहेत. भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधार‍ित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूकीमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदारांसाठी नाव नोंदणी, नाव वगळणे तसेच   तपशिलातील दुरूस्ती इत्यादी कामे म