एपीएल कार्डधारकांनी प्रतिमहा रोख रक्कम योजनेचा लाभ घ्यावा

 

एपीएल कार्डधारकांनी प्रतिमहा रोख रक्कम योजनेचा लाभ घ्यावा

अमरावती, दि. 26 : अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 862 शेतकरी एपीएल कार्डधारक असून त्यांची एकूण संख्या 16 हजार 268 आहे. या सर्व शेतकरी एपीएल कार्डधारकांना शासन निर्णय दि. 28 फेब्रुवारी 2023 नुसार अन्नधान्याऐवजी प्रतिमहा प्रतिलाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणासाठी (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर-डीबीटी) योजना कार्यान्वित झालेली आहे. असे असताना अमरावती शहरात सदर योजनेसाठी अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी)  शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी, 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची (डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर-डीबीटी) योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किंमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाच्या तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

शहरातील सर्व एपीएल कार्ड धारकांना आवाहन करण्यात येते की, या योजनेत समाविष्ट होण्यासाठी अर्ज, राशनकार्ड झेरॉक्स, सात बारा उतारा, कुटुंबातील सदस्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स व आधारकार्डसह अर्ज अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे दाखल करावा. जेणेकरुन शासन निर्णयाप्रमाणे देय रक्कम कार्डधारकांच्या खात्यात जमा करता येईल, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी उमेश खोडके यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती