Wednesday, July 19, 2023

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाची संधी

 

आदिवासी उमेदवारांना स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाची संधी

       अमरावती, दि. 19 : आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपुर, कॅम्प, परतवाडा येथे शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांसाठी आदिवासी उमेदवारांना विनामुल्य प्रशिक्षण देऊन तयारी करवून घेण्यात येते. प्रशिक्षण कालावधी दि. 1 ऑगस्ट  ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत असून या कालावधीत प्रशिक्षणार्थींना दरमहा एक हजार रूपये एवढे विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विविध विषयांच्या  4 पुस्तकांचा संच विनामूल्य देण्यात येईल.

         प्रशिक्षण कालावधीत अटींची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या एस. टी. प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी त्यांचे अर्ज बुधवार, दि. 26 जुलै 2023 पर्यंत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अचलपूर या पत्यावर सादर करावे. अर्जामध्ये स्वत:चे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, प्रवर्ग (जात), जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ऑनलाईन कार्ड http://rojgar.mahaswayam.in इत्यादी कागदपत्रे व पासपोर्ट साईज छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.

          या प्रशिक्षणासाठी उमेदवार निवडीसाठी दि. 27 जुलै 2023 रोजी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. तरी दि. 26 जुलै 2023 पर्यंत कार्यालयात अर्ज सादर करावेत आणि दि. 27 जुलै 2023 रोजी मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह उपस्थित राहावे, निवड यादी दि. 28 जुलै 2023 रोजी कार्यालयीन सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल.

प्रशिक्षणाच्या अटी

       उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 30 चे दरम्यान असावे, उमेदवार किमान एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी झालेली असावी.

आवश्यक कागदपत्र

       शाळा सोडल्याचा दाखला, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, एस. एस. सी. उत्तीर्णची गुणपत्रिका, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयात नोंदणी असल्याचे प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, अचलपूर यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...