Friday, July 14, 2023

शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 


शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 14 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025 हंगामासाठी अमरावती जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची ‘अंमलबजावणी यंत्रणा म्हणून निवड केली आहे. त्यानुसार विमा कंपनीने जिल्हा व तालुका स्तरावर शासनाने दिलेल्या निकषानुसार मनुष्यबळ नियुक्ती व सुविधायुक्त कार्यालयाची स्थापना केली असून कार्यालय कार्यान्वित केले आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी अंतीम मुदत 31 जुलै 2023 आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

पीक विमा पोर्टल सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना केवळ ‘1 रुपया भरुन योजनेतील सहभागाची नोंदणी सामुहिक सेवा केंद्रावर (सीएससी) करता येईल. पीक विमा योजनेत सामुहिक सेवा केंद्राच्या माध्यमातून झालेल्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांमागे प्रती अर्ज 40 रुपये प्रमाणे रक्कम विमा कंपनीकडून सामुहिक सेवा केंद्र चालकांना देण्यात येते. त्यामुळे सामुहिक सेवा केंद्रावर 1 रुपयाच्या रकमेची मागणी केल्यास तात्काळ जिल्हा, तालुका स्तरावरील कृषी विभागाचे कार्यालय अथवा विमा कंपनीच्या प्रतिनीधींशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शेतकरी सहभागासाठी सामुहिक सेवा केंद्रांवर काही अडचणी असल्यास जिल्हा समन्वयक सोमनाथ तंवर (7048979179) किंवा प्रशांत तायडे (7048936164) यांच्याशी संपर्क साधावा,

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...