Friday, July 14, 2023

जागतिक कौशल्य स्पर्धेत स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 जागतिक कौशल्य स्पर्धेत स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

            अमरावती, दि. 13 : जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. ही दर दोन वर्षांनी होते. 23 वर्षाखालील तरुणांसाठी ही कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. सन 2024 मधील स्पर्धा ल्योन, फ्रांस येथे आयोजित करण्यात आली आहे. जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने विविध 52 क्षेत्रांशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्कील कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानुसार या स्पर्धेमधून जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.

पात्रता निकष

            जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2002 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरींग, क्लाऊड कंम्प्युटींग, सायबर सेक्युरिटी, डिजीटल कंन्स्ट्रक्शन, इन्डस्ट्रीयल डिझाईन टेक्नॉलॉजी, इन्डस्ट्री 4.0, इन्फॉरमेशन नेटवर्क गॅम्बलींग, मॅकॅट्रॉनिक्स, रोबोट सिस्टम इन्टेग्रेशन आणि वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्रासाठी उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, 1999 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.

            सन 2024 मधील ल्योन, फ्रांस येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य व देश पातळीवरून प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआयएस), तंत्रनिकेतन महाविद्यालये (पॉलिटेक्निक), अभियांत्रिकी महाविद्यालये (इन्जीनिअरिंग कॉलेजेस), एमएसएमइ टूल रुम्स, सीआयपीइटी, आयआयटी, महाराष्ट्र स्टेट स्किल युनिर्व्हसिटी एमएसबीव्हीइटी, प्रायव्हेट स्किल युनिर्व्हसिटी, फाईन आर्ट कॉलेज, फ्लॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, इस्टिट्यूट ऑफ ज्वेलरी मेकींग प्रशिक्षण संस्था, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

            या स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच निवड केलेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य या कार्यालयामार्फत प्रदान करण्यात येईल. तरी सन 2024 मधील ल्योन, फ्रांस येथे आयोजित केलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर भेट देवून आपली नाव नोंदणी करावी. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिद जवळ, बस स्टॅन्ड रोड, अमरावती येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अभिषेक एस. ठाकरे यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...