Wednesday, July 26, 2023

चिखलदरा ते आमझरी रस्ता पुर्ववत सुरु






 चिखलदरा ते आमझरी रस्ता पुर्ववत सुरु

अमरावती, दि. 26 :  मंगळवार, दि. 25 जुलै 2023 रोजी रात्रीच्यावेळी आलेल्या जोरदार पावसामुळे चिखलदरा तालुक्यातील चिखलदरा ते आमझरी रस्त्यावरील दरड कोसळून तात्पुरता रस्ता बंद झाला होता. सकाळी सार्वजनिक बांधकाम चिखलदरा येथील यंत्रणेमार्फत दोन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील मलबा हटविण्याचे काम तातडीने करण्यात आले असून सकाळी 11.30 वाजता पासून वाहतूक सुरळीतपणे पुर्ववत सुरु झालेली आहे, अशी माहिती चिखलदरा तहसीलदार गजानन राजगडे यांनी दिली आहे.  

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...