मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

 

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अमरावती, दि. 6 : जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा मोफत पुरविण्यात येतात. वसतिगृहातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे.

सन 2023-24 साठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी अमरावती स्थानिक वसतिगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 1 निंभोरा, अमरावती येथे स्वीकारले जातील. वरिष्ठ महाविद्यालय (अव्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेशासाठी प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट क्रमांक 2 निंभोरा, अमरावती येथे स्वीकारले जातील. तसेच मुलींच्या वसतिगृहामध्ये कनिष्ठ महाविद्यालय प्रवेशासाठी प्रवेश अर्ज विभागीय स्तरावरील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, युनिट क्रमांक 4 जेल रोड, अमरावती येथे स्वीकारले जातील. वरिष्ठ महाविद्यालय (अव्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेशाकरीता प्रवेश अर्ज 125 वी जयंती मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, विलास नगर, अमरावती येथे स्वीकारले जातील. तसेच तालुका स्तरावरील मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता आठवी ते पुढील अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

तालुका स्तरावरील वसतिगृहात प्रवेशाबाबत इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित गृहप्रमुख किंवा गृहपाल यांच्याकडे सादर करावे. यामध्ये शालेय अभ्यासक्रम इयत्ता आठवी ते दहावीसाठी अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख 12 जुलै आहे. कनिष्ठ महाविद्यालय तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातील प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या जाहीर करण्यात येईल.

शालेय विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज 12 जुलैपर्यंत सादर करावे. पहिली निवड यादी 14 जुलैला प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 23 जुलैपर्यंत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 26 जुलैला प्रसिध्द करण्यात येईल. तसेच दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येईल.

इयत्ता दहावी व बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत आहे. पहिली निवड यादी 7 ऑगस्टला प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 17 ऑगस्टपर्यंत राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 23 ऑगस्टला प्रसिध्द करण्यात येईल. तसेच दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येईल.

बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी. अशा बारावीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी, तसेच एम.ए., एम.कॉम. असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका, इत्यादी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची पहिली निवड यादी 7 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येईल. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतीम मुदत 17 ऑगस्टपर्यंत राहील. तसेच रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 23 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना 31 ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी 0721-2661261 यावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती