Friday, July 14, 2023

महाडीबीटी संकेतस्थळावर नुतनीकरणाचे अर्ज सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

महाडीबीटी संकेतस्थळावर नुतनीकरणाचे अर्ज

सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

 

            अमरावती दि. 14 : माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2022-23 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गासाठी नुतनीकरणाचे अर्ज व नवीन अर्ज भरण्यासाठी  दि. 31 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सन 2021-22 साठी रि-अप्लाय करण्यासाठी  दि. 31 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज विहित मुदतीत भरण्यासाठी   https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नुतनीकरणाचे अर्ज तसेच विद्यार्थ्यांच्या  लॉगिनमधील त्रुटी पुर्ततेसाठी महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांसाठी सूचना फलक लावून विहित मुदतीत नोंदणीकृत अर्ज सादर करण्याची कार्यवाही करावी. तसेच पात्र अर्जदारांनी आपले अर्ज नोंदणीकृत करून ऑनलाईन महाविद्यालयांकडे सादर करावेत. विहित वेळेत अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील. 

महाडीबीटी संकेतस्थळावर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयांना नुतनीकरणाचे अर्ज भरुन रि-अप्लाय करण्यासाठी आणि सेंट बॅक केलेल्या अर्जाची त्रृटी पूर्तता करण्याचे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...