चांदुर बाजार तहसिल कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट
अमरावती दि.27 : जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकतीच चांदुर बाजार तहसिल कार्यालयाला भेट देऊन विविध विभागाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांचासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा उपस्थित होते.
तहसिलदार कार्यालयातील विविध विभागाना भेटी देऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना यावेळी दिल्या. त्यानंतर चांदुर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील पुलाच्या बांधकामास भेट देवून उपविभागीय अभियंता यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पुर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी, कर्मयोगी गाडगेबाबांची कर्मभूमी नागरवाडी, आश्रमशाळा तसेच कलादालनास भेट दिली. अचलपूरचे उपविभागीय अधिकारी, चांदुर बाजार तहसीलदार, नायब तहसीलदार, कार्यकारी अभियंता, उपअभियंता कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
000000

.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment