Tuesday, July 11, 2023

खते तसेच बियाण्यांचा मुबलक साठा शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे कृषी विभागाचे आवाहन

 

खते तसेच बियाण्यांचा मुबलक साठा

शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे

कृषी विभागाचे आवाहन

 

अमरावती, दि. 10 : कमी पावसामुळे सद्यस्थितीत पेरणीची कामे संथ गतीने सुरु आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच प्रामुख्याने भात रोपवाटीकेची कामे सुरु आहेत. दि. 1 जून ते दि. 10 जुलै या कालावधीमध्ये राज्याचे सरासरी पर्जन्यमान 314.3 मि.मी. असून या खरीप हंगामात आज दि. 10 जुलपर्यंत प्रत्यक्षात 227.3 मि.मी. एवढा पाऊस पडलेला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास पेरणीच्या कामास वेग येईल.

खरीप हंगाम 2023 साठी 19.21 लक्ष क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लक्ष क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. राज्यात 16 लक्ष 82 हजार 245 क्विंटल (87%) बियाणी पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे. बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेते यांच्याकडून बियाणे खरेदी करावे तसेच खरेदीची पावती व टॅक्स जपून ठेवणे आवश्यक आहे.

खरीप हंगामासाठी राज्यास 43.13 लक्ष मे.टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून आतापर्यंत 46.07 लक्ष मे.टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापैकी 18.95 लक्ष मे.टन खतांची विक्री झालेली आहे. सद्यस्थितीत राज्यात 27.12 लक्ष मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी व तक्रारींचे निवारण करण्यासाठी 18002334000 हा हेल्पलाईन क्रमांक आहे. शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार त्याचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) खरीप हंगामामध्ये सहभागी होण्याची अंतीम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...