युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 18 जुलै रोजी 48 रिक्तपदांवर होणार भरती

 

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 18 जुलै रोजी

48 रिक्तपदांवर होणार भरती

 

            अमरावती, दि. 12 : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दर महिन्याच्या, तिसऱ्या मंगळवारी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 18 जुलै 2023 रोजी होणार आहे. स्थानिक तसेच अन्य जिल्ह्यातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योग समूहामध्ये काम करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

          जिल्हयातील युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्याचाच पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या तिस-या मंगळवारी "जागेवरच निवड" (On Spot Selection) मोहीम आयोजित करण्यात येत आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.

48 रिक्तपदांसाठी राबविणार भरती प्रक्रिया

        या मेळाव्यामध्ये 48 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती जाधव मोटर्स प्रा.लि. या उद्योगामध्ये 5 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामध्ये सेल्स एक्झ्युकेटीव्हची  5 पदे उपलब्ध आहेत. तसेच अमरावती  प्लास्टीसर्ज इंडस्ट्रीज, प्रा.लि. या उद्योगामध्ये 6 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामध्ये बीजनेस डेव्हलपमेन्ट मॅनेजर 1 पद, प्रोडक्शन मॅनेजर 1 पद, एक्झ्युकेटीव्ह असिस्टंन्ट ते डायरेक्टर 3 पदे, टेन्डर एक्झ्युकेटीव्हच्या एका पदाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे अमरावती सारडा सर्जिकल ॲन्ड मॅटरनिटी होम हॉस्पीटल, 7 पदे, यामध्ये नर्सिंग 3 पदे, अटेडंन्ट 2 पदे तसेच हाऊसकिपींग स्टाफ 2 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती ए. जी. एस. इंशुरन्स कं. लि. या उद्योगामध्ये सेल्स एक्झ्युकेटीव्हच्या 30 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.  अशा एकूण 48 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

            या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://shorturl.at/kosQT  या लिंकवर  जाऊन निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी. अथवा विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून निःशुल्क ऑनलाईन नोंदणी करावी.

           यापूर्वी नोंदणी केली असल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जावून Employment वर क्लिक करावे. Job Seeker (Find a Job ) या ऑप्शनवर क्लिक करावे. JOB SEEKER LOGIN हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक,आधार क्रमांक आणि पासवर्ड क्रमांकाचा वापर करुन LOGIN व्हावे. त्यांनतर Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा पर्याय निवडावा. Amravati जिल्हा निवडून Filter द्यावे. त्यानंतर आपल्याला अमरावती जिल्हयातील रोजगार मेळाव्यांची यादी दिसून येते. त्यातील ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह, पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा -4, दिनांक- 18/7/2023 मेळाव्याची निवड करावी. त्यानंतर Vaccancy List या टॅबवर क्लिक करावे. ‘I Agree’ हा पर्याय निवडून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध पदे दिसून येतील. त्यानंतर Apply बटणावर क्लिक करावे. शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.

         याबाबत काही अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा. तसेच 18 जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, उस्मानिया मस्जिदजवळ, बस स्टँड रोड, अमरावती येथे स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त अभिषेक एस. ठाकरे  यांनी केले आहे.

***

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती