Posts

Showing posts from October, 2021

वऱ्हा व साऊर या गावातील आपद्गग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप

Image
  वऱ्हा व साऊर या गावातील आपद्गग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते   धनादेशाचे वाटप शासन खंबीरपणे आपद्ग्रस्तांच्या पाठीशी - पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर   अमरावती , दि. ३१: नुकसानग्रस्तांचे पूर्ण नुकसान भरून काढणे शक्य नसले तरी शासन निर्णयातील तरतुदीनुसार प्रत्यक्षात जेवढे   नुकसान झाले आहे तेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न नवीन शासन निर्णयानुसार केला आहे. नुकसानग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे त्यांनी खचून न जाऊ नये , असा दिलासा पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी शेतकरी बांधवांना दिला. जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस , वादळ व    अतिवृष्टीमुळे   नागरिकांच्या घरांची पडझड व नुकसान झाले. नुकसानग्रस्त नागरिकांच्या घराच्या   नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होताच शासनाकडून त्यांना मदत देण्यात आली आहे. त्या संबंधातील तिवसा व भातकुली तालुक्यातील   नुकसानग्रस्तांना धनादेशाचे वाटप आज पालकमंत्री श्रीमती ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते   करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.               वऱ्हाच्या सरपंच निलिमा समरीत , उप

निरीक्षणगृह- बालगृहातील विद्यार्थिनींच्या कलाकृती प्रदर्शनाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

Image
  निरीक्षणगृह- बालगृहातील विद्यार्थिनींच्या कलाकृती   प्रदर्शनाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुलांच्या कौशल्य विकासासाठी यापुढे मोठ्या स्वरूपात उपक्रम - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर   - उपक्रमाबाबत राज्यस्तरावर धोरण आखणार - ५३ योजनांचे पुनर्मुल्यांकन - अनाथ बालकांना ५ लाख मुदतठेव प्रमाणपत्रांचे वाटप   अमरावती , दि. ३१ : निरीक्षणगृह व बालगृहातील मुलींनी प्रशिक्षण घेऊन कल्पकता व मेहनतीच्या बळावर सुंदर कलात्मक वस्तू तयार केल्या. या मुलांच्या कौशल्यांचा विकास घडवणे , मानसिक बळ व सकारात्मकता वाढविणे यासाठी प्रदर्शनाचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर हाती घेतला. ही प्रायोगिक तत्वावरील तथापि , महत्वपूर्ण सुरुवात आहे. पुढील वर्षी हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल व यादृष्टीने राज्यस्तरावर धोरणही आखण्यात येईल , असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.   शासकीय मुलीचे निरीक्षणगृह व बालगृह येथील विद्यार्थिनींनी हस्तकलेद्वारे तयार केलेल्या उत्तमोत्तम वस्तूंचे प्रदर्शन व विक्री प्रदर्शनाचा शुभारंभ आज सकाळी बचतभवनात

सायबर सुरक्षिततेवर भर द्यावा - गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील

Image
    शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामांचा आढावा  सीसीटीव्ही नेटवर्कबाबत नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करा खासगी आस्थापनांच्या सीसीटीव्ही यंत्रणांचे मॅपिंग करा सायबर सुरक्षिततेवर भर द्यावा -       गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील   अमरावती, दि. 28 : सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनातून टप्प्याटप्प्याटप्प्याने निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. खासगी आस्थापनांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने कलम १४४ नुसार आदेश निर्गमित करावा. अशा यंत्रणांची माहिती संकलित करून मॅपिंग करावे, असे निर्देश गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आज येथे दिले. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात टेक्नोसॅव्ही तरूण कर्मचा-यांना प्रोत्साहित करून तशी जबाबदारी सोपवावी, अशीही सूचना त्यांनी केली. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या कामांचा आढावा गृह राज्यमंत्री श्री. पाटील यांनी आज आयुक्तालय येथे घेतला, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त विक्रम

आवास योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा; गरजूंना घरे उपलब्ध व्हावी - गृहराज्यमंत्री सतेज पाटील

Image
  गृहराज्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा आढावा आवास योज नांची   कामे   तात्काळ   पूर्ण करा; गरजूंना   घरे उपलब्ध व्हावी -           गृहराज्यमंत्री सतेज पाटील   अमरावती   , दि .   28   :   पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा अंतर्गत लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध व्हावीत. तसेच यासाठी बँकांनी लाभार्थ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून द्यावे . त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, तसेच अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करावीत,   असे   सुस्पष्ट   आदेश गृहराज्यमंत्री   (शहरे)   सतेज पाटील यांनी आज येथे दिले. भारतनेट, म्हाडा, प्रादेशिक परिवहन एस. टी., तसेच   आवास योज ना या सं बं धी गृहराज्यमंत्र्यां च्या अध्यक्षतेखाली   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये   झाली,   त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर ,   मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंड्या , महापालिका आयुक्त प्रशांत रोडे   तसेच संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.       गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले की ,   पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा अंतर्गत    घरांसाठी लाभार्थ्यांना बँकांमार्फत त्वरित कर्ज मि

मानव विकास कार्यक्रमाचा निधी त्यात अंतर्भूत योजनांसाठीच खर्च व्हावा - राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

Image
  अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा जिल्हा वार्षिक योजना, उपयोजना व मानव विकास कार्यक्रमासाठी  विभागात दीड हजार कोटींहून अधिक तरतूद मानव विकास कार्यक्रमाचा निधी त्यात अंतर्भूत योजनांसाठीच खर्च व्हावा                                    -  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर     अमरावती ,  दि.  27  : मानव विकास कार्यक्रमात  13 योजना अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातील निधी त्या तेरा  योजनांसाठीच खर्च करावा. अन्य कामांसाठी हा निधी वापरू नये ,  असे  स्पष्ट  निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी  आज येथे  दिले.   अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी श्री. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नियोजन भवनात झाली ,  त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह ,  अमरावती च्या  जिल्हाधिकारी पवनीत कौर ,  मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा ,  अकोला च्या  जिल्हाधिकारी निमा अरोरा, बुलडा ण्याचे  जिल्हाधिकारी एस. राममूर्ती ,  वाशिम चे  जिल्हाधिकारी षण्मुख राजन एस., यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, निय