देवरा येथे 'ग्रामस्वच्छता अभियान' व 'शासन आपल्या दारी' उपक्रमनागरिकांच्या कृतीशील सहभागाने विकासाला गती- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर


देवरा येथे 'ग्रामस्वच्छता अभियान' व 'शासन आपल्या दारी' उपक्रम
नागरिकांच्या कृतीशील सहभागाने विकासाला गती
- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १९ : नागरिकांमधील जागरूकता व कृतीशील सहभाग यामुळे विकासाला गती मिळते. याचा आदर्श देवरा गावाने घालून दिला आहे. त्यानुसार 'ग्रामस्वच्छता अभियान' व 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतही अधिकाधिक सहभाग घेऊन ते यशस्वी करावेत, असे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज देवरा येथे केले.

देवरा येथे महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, श्री वसंतबाबा संस्थान व श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे १९ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान ग्रामस्वच्छता अभियान व शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या. सरपंच मनिषाताई वरघट, उपसरपंच गजाननराव देशमुख व अनेक मान्यवर उपस्थित होते.

'शासन आपल्या दारी' उपक्रमात
उपक्रमात सातबारा निर्दोष करणे, ई पीक पाहणी, कागदपत्रे, नोंदी दुरुस्ती आदी कामे होतील.
पुढील महिनाभरात शिबीरे, सभांच्या माध्यमातून महसुली नोंदीसाठीच्या सर्व अर्जाचे निराकरण करण्यात येईल, असे तहसीलदार श्री. काकडे यांनी सांगितले.

देवरा येथील यश तेलखेडे या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले असून, त्याला १५ हजाराचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गावात ग्रामपंचायत, संस्थान व मंडळाच्या माध्यमातून ग्रामस्वच्छता अभियानही राबवले जात आहे. गावात कचरा संकलनासाठी रोज कचरागाडी फिरते. येथे भांडारगृहाचे बांधकामही करण्यात आले आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

    ०००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती