'मिशन कवचकुंडल’द्वारे कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गतीमहिलांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी पवनीत कौर

'मिशन कवचकुंडल’द्वारे कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती
महिलांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा
- जिल्हाधिकारी पवनीत कौर

    अमरावती, दि. 13 : ‘मिशन कवचकुंडल’द्वारे कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येत असून, कुटुंबातील सर्वांचे लसीकरण होण्याच्या दृष्टीने महिलांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

            जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांच्या समन्वयातून मिशन कवचकुंडल मोहिम राबविण्यात येत आहे. प्रथम डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात आहे. त्याचप्रमाणे, पहिला डोस झालेल्या व दुस-या डोसकरिता पात्र लाभार्थ्यांच्या लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. मोहिमेत 8 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण पहिला मात्रेचे लसीकरण 33 हजार 560 व्यक्तींना व दुसरा मात्रेचे लसीकरण 24 हजार 921 व्यक्तींना करण्यात आले. याप्रमाणे एकूण 58 हजार 481 लाभार्थ्यांनी मोहिमेचा लाभ घेतला, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

                  जिल्ह्यात 12 ऑक्टोबरपर्यंत अद्यापपर्यंतच्या एकूण आकडेवारीनुसार पहिल्या मात्रेचे लसीकरण 11 लाख 33 हजार 173 व दुस-या मात्रेचे लसीकरण 5 लाख 439 व्यक्तींना झाले आहे. त्यानुसार लसीकरणाची एकूण आकडेवारी 16 लाख 33 हजार 612 आहे. लसीकरणासाठी 22 लाख व्यक्तींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्ट्याच्या टक्केवारीनुसार, पहिली मात्र 51 टक्के व दुसरी मात्रा 23 टक्के व्यक्तींना देण्यात आली.  संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी अधिकाधिक जनजागृती करावी. महिलाभगिनींनी कुटुंबातील सर्वांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेऊन लसीकरणाचे कार्य पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

            मोहिमेत तहसीलदार, गटविकास अधिका-यांपासून ते गावपातळीवरच्या अधिकारी व कर्मचा-यांसह बचत गट, महिला व युवकांची मंडळे, स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य मिळविण्यात आले आहे.   

                         000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती