Posts

Showing posts from August, 2018

साद्राबाडी येथे जिल्हा प्रशासनाकडून पाहणी सखोल संशोधनासाठी 2 पथके कार्यरत - अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची माहिती

Image
* साद्राबाडी व परिसरात सुसज्ज यंत्रणा * नागरिकांच्या सुविधेसाठी वॉटरप्रुफ तंबू   नागरिकांनी    मनोधैर्य राखण्याचे   पालकमंत्र्यांचे आवाहन   अमरावती, दि.    31 :   धारणी तालुक्यातील साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या (जीएसआय) पथकाने ही घटना भूकंप नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला असला तरी अधिक संशोधन सुरु आहे. जीएसआय व एनसीएसच्या (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ) अहवालानंतर नेमके कारण कळू शकेल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली. साद्राबाडी व परिसरात सर्व विभागाच्या समन्वयाने यंत्रणा सुसज्ज असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी साद्राबाडी येथील घटनेबाबत जिल्हा प्रशासनातील अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदींनी परिसराला भेट देऊन गावक-यांशी संवाद साधला. श्री. परदेशी म्हणाले की, साद्राबाडी येथे भूगर्भातून आवाज व हालचालीच्या घटना सतत घडत असल्याने

एसटीच्या आधुनिकीकरणाबाबतची आढावा बैठक राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
एसटीच्या आधुनिकीकरणाबाबतची आढावा बैठक राज्य परिवहन महामंडळाने ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत   –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई ,  दि. 30 : जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्यास राज्यातील प्रवाशी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या  –  एसटीकडेच आकर्षित होतील, त्यादृष्टीने बसस्थानकांवर अत्याधुनिक आणि उत्कृष्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. एसटीने मुंबई-पुणे आणि मुंबई-नाशिक तसेच तीनशे किलोमीटर्स अंतराच्या वाहतुकीसाठी ई-बस सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आधुनिकीकरणाच्या विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीस परिवहन मंत्री दिवाकर रावते तसेच एसटीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल तसेच महामंडळाच्या विविध विभागांचे महाव्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ,  मुंबई  – पुणे ,  मुंबई- नाशिक तसेच तीनशे किलोमीटर्स अंतराव
Image
अमरावती जिल्ह्याला पाणी पुरवठा व शौचालय बांधकामासाठी 330   कोटी   75   लक्ष निधी मंजूर                                           -पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर अमरावती, दि. 30  :  जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना शुध्द व सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी तसेच शौचालय बांधकामासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 330 कोटी 75 लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला उपरोक्त मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भरीव निधी मंजूर करुन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्री महोदयांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच केंद्र सरकारच्या सहकार्याने अमरावती जिल्ह्याला भरघोस निधी प्राप्त झाला आहे.             यामध्ये सन 2018-19 या वर्षाकरीता जिल्ह्यातील गावांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत 202 गावांसाठी 163 योजना राबविण्यासाठी 77 कोटी 67 लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

जय महाराष्ट्र'कार्यक्रमात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

Image
'     मुंबई ,  दि.  30 :  माहिती व जनसंपर्क महासंचालक निर्मित  ' जय महाराष्ट्र '  कार्यक्रमात   ‘ सुजल महाराष्ट्र-निर्मल महाराष्ट्र ’  या विषयावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि .   ३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३०  ते ८  या वेळेत प्रसारित होणार आहे. राज्यातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सुरू असलेले कामकाज , दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न , वॉटरग्रीड योजना ,  जलस्वराज्य कार्यक्रम , राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ,  जलयुक्त शिवारमधील कामांचा सकारात्मक परिणाम तसेच पाणीपुरवठा योजनांची सद्य:स्थिती संदर्भात  ' जय महाराष्ट्र ' कार्यक्रमातून सविस्तर माहिती श्री. लोणीकर यांनी  कार्यक्रमातून दिली आहे.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्यावतीने केरळ पुरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

Image
मुंबई ,  दि. 30 : मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास यांच्यावतीने केरळ राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांच्या आर्थिक सहायाचा धनादेश मंदिरांच्या विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदेश बांदेकर ,  कोषाध्यक्ष सुमंत घैसास ,  विश्वस्त भरत परिख ,  महेश मुदलियार ,  आनंद राव ,  गोपाळ दळवी ,  संजय सावंत ,  श्रीमती विशाखा राऊत , सुबोध आचार्य ,  श्रीमती वैभवी चव्हाण आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि केरळमधील पुरग्रस्तांप्रतीच्या सहृदयतेबाबत कौतूक केले. 

दिलखुलास' कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

Image
मुंबई ,  दि.  ३० : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित  ' दिलखुलास '  कार्यक्रमात  ' ज्येष्ठ नागरिक धोरण '  या विषयावर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून शुक्रवार  दि. ३१ ऑगस्ट आणि शनिवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४०  या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाचे प्रमुख उद्देश व त्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा ,  वृद्ध मित्र संकल्पना ,  स्वयंसेवी संस्थांमार्फत विरंगुळा केंद्र व स्मृतिभ्रंश केंद्रांची स्थापना ,  ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कार्य ,  त्यांना योग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाने आखलेली  मार्गदर्शक  तत्वे ,  ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी वॉर्डन योजना तसेच ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेला कृती आराखडा या विषयांची माहिती श्री .  बडोले यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. ००००

राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व संनियंत्रण समितीची आढावा बैठक ॲट्रॉसिटी कायद्याची गुणवत्तापूर्ण व योग्य अंमलबजावणी व्हावी - मुख्यमंत्री

Image
         मुंबई ,  दि.  30 :  पुरोगामी राज्यात   अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीबाबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत ,  यासाठी प्रयत्न करावेत. अत्याचार प्रतिबंधक   कायद्याची (ॲट्रॉसिटी) गुणवत्तापूर्ण व योग्य अंमलबजावणी व्हावी ,  असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित राज्यस्तरीय उच्चाधिकार दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले , शिक्षण मंत्री विनोद तावडे ,  सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे ,  खासदार अमर साबळे ,  डॉ. सुनील गायकवाड ,  आमदार सुजित मिणचेकर ,  डॉ. मिलिंद माने ,  मुख्य सचिव दिनेश कुमार जैन , गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल ,  विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार ,  गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता ,  विशेष पोलीस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण) कैसर खलिद ,  राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थुल ,  समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बैठकीत