महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा क्रांतीदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान



 नवी दिल्ली दि. 08 :  ‘भारत छोडो’ आंदोलनगोवा मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान देणा-या महाराष्ट्रातील 10 स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती  रामनाथ कोविंद  यांच्या हस्ते गुरूवारी क्रांती दिनी राष्ट्रपती भवन येथे सन्मान होणार आहे.
क्रांतिदिनाचे औचित्य साधून भारत छोडो आंदोलनाच्या 76 व्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळयाचे आयोजन  करण्यात येते. 
गुरूवारी सन्मान होणा-या स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील सांगली जिल्हयातील कुपवडा येथील  श्री देवप्पा खोत,  नागपूर जिल्ह्यातील श्री गणपतराव गभणेपरभणी जिल्ह्यातील  डॉ. अवधूत डावरे आणि श्री  वसंत अंबुरे,  मुंबईतील श्री गदाधर गाडगीळ आणि श्री अनंत गुरव,  पुणे जिल्ह्यातील  श्री बाळासाहेब जांभूळकरश्री अरविंद मनोलकरश्री वसंत प्रसादे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील श्री वसंतराव माने या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान होणार आहे.
भारत छोडो’ आंदोलन, ‘गोवा मुक्ती संग्राम’, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनयासोबतच देशभरात झालेल्या विविध आंदोलनात सहभागी स्वातंत्र्य सैनिकांचा दरवर्षी  9 ऑगस्ट क्रांती दिनीसन्मान केला जातो.
0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती