मंत्रालयात स्वातंत्र्यदिन साजरा विविध क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राज्याचा पुरोगामित्त्वाचा वारसा कायम ठेवू या ! - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस







            मुंबईदि. 15: शेतीपाणीगुंतवणूकगृहनिर्माण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र देशात अव्वल कामगिरी करत असताना राज्याने आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्वातंत्र्यदिनी मंत्रालय येथे ध्वजारोहणप्रसंगी केले.
            भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालेत्यावेळी ते बोलत होतेभारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक,क्रांतीकारक तसेच हुतात्म्यांना अभिवादन करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीआपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करत असलेल्या जवानांना तसेच बळीराजालाही अभिवादन करत आहे.आपले राज्य अनेक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत पुढे जात आहेस्वच्छ भारत अभियानस्वच्छ शहरेराहण्यायोग्य शहरांचा निर्देशांकपरकीय थेट गुंतवणूक आदी वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमात देशात सातत्याने अग्रेसर कामगिरी करत आहे.
            महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण करत आहोतपुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे शासनाने निश्चित केले आहेया लोकसहभागाच्या चळवळीने राज्यात एक अभूतपूर्व क्रांती केली आहेविशेषतपावसाच्या खंड असलेल्या कालावधीत पिकांना शाश्वत  सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने उत्पादकता वाढली आहे.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले कीउत्पादकता वाढत असतानाच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहेत्यासाठी केंद्र शासनाने उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात़ वाढ केली आहेतसेच राज्य शासनानेही मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याची खरेदी केली आहे. 1999 ते 2014 या 15 वर्षांतच्या कालावधीत करण्यात आलेल्या 450 कोटी रुपयांच्या अन्नधान्य खरेदीच्या तुलनेत गेल्या 3 वर्षात 8 हजार कोटी रुपयांची अन्नधान्याची विक्रमी खरेदी करण्यात आली आहेशेतकऱ्यांच्या प्रती राज्य शासनाची प्रतिबद्धता यातून दिसून येते.
            जागतिक बँकेच्या मदतीने दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहेतविदर्भ आणि मराठवाड्यासाठी शेतीचे संपूर्ण परिवर्तन करु शकणारा स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी प्रकल्प सुरू करण्यात आला असून आता कृषी विपनन तसेच मूल्यवर्धनांतर्गत वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
            त्यांनी पुढे माहिती दिली कीआपले राज्य औद्योगिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर आहेराज्यात जास्तीत जास्त उद्योग यावेतअधिकाधिक परकीय गूंतवणूक यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘व्यवसाय सुलभता’ (इज ऑफ डुईंग बिझनेसधोरण राबविण्यात येत असल्यामुळे गेल्या 2 वर्षात देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.रोजगारनिर्मितीतही राज्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहेसंघटित क्षेत्रात 8 लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाला आहे.
            अनुसूचित जातीअनुसूचित जमातीइतर मागास वर्ग अशा सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित आहेकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागात राबविण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहेअसेही ते म्हणाले.
            ते पुढे म्हणालेछत्रपती शाहूफुलेआंबेडकर यांचा वारसा आपण पुढे  नेत आहोतराज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी  सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील राहायचे आहेजातधर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ दिला जाणार नाहीयासाठी सामाजिक सौहार्द टिकून राहणे गरजेचे आहेसर्वांना सोबत घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहेअसेही ते म्हणाले.
            मनोगतानंतर मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस तसेच राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केलेव्हीजेटीआयच्या(वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूटविद्यार्थ्यांनी खेळातील ठोकळ्यांचा (क्यूब्जवापर करुन महात्मा गांधींजींच्या प्रतिमा मंत्रालय इमारतीमध्ये बनविली होतीमुख्यमंत्री यांनी या विद्यार्थ्यांच्या कलेला दाद दिली.
            याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरआमदार राज पुरोहितआमदार विनायक मेटेमुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एनएचपाटीलमुख्य सचिव डीकेजैनपोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकरलोकायुक्त न्याएमएलतहलियानीराज्य निवडणूक आयुक्त जेएससहारियामाजी पोलीस महासंचालक ज्युलीयस रिबेरोतिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अधिकारी,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे अध्यक्ष प्रवीण दीक्षितमानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष भगवंतराव मोरेमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ओकअपर मुख्य  सचिव प्रविणसिंह परदेशीसुनील पोरवालबिजय कुमारश्रीकांत सिंह,  शामलाल गोयलसंजय कुमारप्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंद कुमार विविध मंत्रालयीन विभागांचे  प्रधान सचिवसचिव आदी उपस्थित होते.

·         जलयुक्त शिवारअंतर्गत  आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण
·         पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्यात येणार
·         गेल्या तीन वर्षात 8 हजार कोटींची विक्रमी अन्नधान्य  खरेदी
·         देशातील परकीय गुंतवणूकीपैकी 47 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात
·         संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगारनिर्मिती


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती