उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील नागरी समस्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना



मुंबईदि. 13 : गृहनिर्माण आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनाचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
 आज मंत्रालयात आयोजित मुंबई उत्तर मध्य लोकसभा क्षेत्रातील विविध नागरी प्रश्नांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी खासदार पुनम महाजन उपस्थित होत्या.
मुख्यमंत्री म्हणालेमुंबई विमानतळाच्या विस्तारीकरणात बाधित होणाऱ्या विमानपतन प्राधिकरणाच्या जागेवरील झोपड्यांचे पुनर्वसनमिठी नदी रुदींकरण प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसनडिफेन्स लँडवरील घरांचे पुनर्वसनमाहुल येथील सदनिकांचा पुनर्विकास तसेच बांद्राच्या शासकीय इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी संबधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी.
सदर आढावा बैठकीत संघर्ष नगर चांदीवली येथील घरांच्या वाढीव चटई क्षेत्राचा प्रश्नगृहनिर्माण सोसायट्यांना प्रदान केलेल्या कलेक्टर लँडवरील कलेक्टर लँड पॉलिसी नुसार प्रिमिअममध्ये बदल करणेकुर्ला येथील बंद असलेली दुग्धशाळा चालू करणेकुर्ला येथील रिकामी जमीन नाट्यगृहसरकारी रुग्णालये व स्मशानभूमीसाठी उपलब्ध करुन देणेकेदारनाथ विद्या प्रसारिणी शैक्षणिक संस्थेची म्हाडा कार्यालयात प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणे तसेच कुर्ला रेल्वे स्थानक ते बीकेसीपर्यंत स्कायवॉक करण्याबाबत चर्चा झाली. हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी  वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
 या बैठकीला मुख्य सचिव डी.के.जैनमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशीनगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमारम्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद म्हैसकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिकपदुमचे सचिव किरण कुरुंदकर आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती