Tuesday, August 14, 2018


सिडकोच्या 14 हजार 838 घरांच्या सोडतीस प्रारंभ
सिडकोची वर्षाअखेरपर्यंत आणखी 25 हजार घरांची योजना - मुख्यमंत्री

मुंबईदि. 13 : शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तर्फे सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी महागृहनिर्माण योजनेत’ साकारण्यात येणाऱ्या 14 हजार 838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन सोडतीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पुढच्या टप्प्यात आणखी 25 हजार घरांची सोडत वर्षाअखेरीस जाहीर करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोने एक लाख घरे बांधण्यांचे उद्दिष्ट ठेवावेअसे यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. 
यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेताखासदार पूनम महाजननवी मुंबईचे महापौर जयवंत सुतारआमदार मंदा म्हात्रेबाळाराम पाटीलमनोहर भोईरनरेंद्र पाटीलमुख्य सचिव डी. के. जैनगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमारसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्राउपव्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता लवंगारेम्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते.
                मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला घर मिळावेयासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची महत्त्वाकांक्षी घोषणा केली. सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याच्या या योजनेत महाराष्ट्र राज्याने 6.50 लाख घरे बांधून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळविले आहे. राज्यात मुंबई व मुंबई महानगर परिसरात सर्वात जास्त घरांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. म्हाडाला पीपीपी योजनेतून 1 लाख घरे मिळणार आहेत. तसेच घरांसाठी संयुक्त भागीदारी मंजूर केली आहे. घरांच्या या योजनेत सिडकोसुद्धा सहभागी झाली असून नवी मुंबई परिसरात त्यांनी आता ही 14 हजार घरांची योजना सुरू केली आहे. यामुळे गरिबांना चांगल्या किंमतीत व चांगल्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह घरे मिळणार आहेत.
                यंदाच्या घरांच्या योजनेत प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांचा समावेश केला आहे. या लॉटरीतील अर्जांची योग्य प्रकारे छाननी करून गरजू नागरिकांनाच घरे मिळतीलयाची दक्षता घ्यावी. सामान्य माणसांना या योजनेत सहभागी करून घ्यावेअसेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी  श्री. चंद्रा यांनी महागृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये सांगितली.
महागृहनिर्माण योजनेची वैशिष्ट्ये
·         सिडकोच्या योजनेत प्रथमच ऑनलाईन अर्ज नोंदणीचा समावेश
·         https://lottery.cidcoindia.com/ या संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रियेस प्रारंभ
·         सिडकोतर्फे नवी मुंबईतील तळोजाद्रोणगिरीखारघरघणसोलीकळंबोली या पाच नोडमधील 11 ठिकाणच्या घरांचा समावेश आहे.
·         एकूण 14 हजार 838 घरांपैकी 5 हजार 262 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर 9 हजार 576 घरे ही अल्प उत्पन्न घटकांतील नागरिकांसाठी आहेत.
·         प्रत्यक्ष अर्ज नोंदणीस 15 ऑगस्टपासून सुरुवात तर 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकृती
·         2 ऑक्टोंबर रोजी सोडतीची लॉटरी काढण्यात येणार आहे.
·         प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्याला 2.5 लाख रुपयांचे अनुदान मिळणार
अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यास सी.एल.एस.एस.च्या माध्यमातून 2.67 लाख रुपयांचे अनुदान मिळणार


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...